श्रीरामपूर:-बेलापुरच्या उपसरपंचांचा वाद आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.
श्रीरामपूर:-बेलापुरच्या उपसरपंचांचा वाद आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात.
येथील सत्ताधारी गटातील सरपंच – उपसरपंच यांच्यातील वाद आता गाव पातळीपुरता सिमित न राहता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोहोचला असुन त्याची आज बुधवार दि4 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे
यासंदर्भात बेलापुर बुद्रकचे विद्यमान उपसरपंच अभिषेक भास्करराव खंडागळे व सदस्य मुश्ताक उमर शेख यांनी विद्यमान सरपंच महेंद्र जगन्नाथ साळवी व ग्रामसेवक बेलापूर बुद्रक यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत बेलापुर बुदुक यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 7 प्रमाने ग्रामसभा संदर्भात विवाद अर्ज जिल्हाधिकरी . अहमदनगर यांच्या न्यायालयात दाखल केला आहे
त्याची सुनावणी आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या दालनात होणार असुन या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखेच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि २8 सप्टेंबर २०२३ अन्वये वादी आणि प्रतिवादी यांनी आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रांसह त्यावर आपले लेखी म्हणणे सादर करणेकामी स्वतः अगर विघिजामार्फत आज दि 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत विशेष म्हणजे वादी आणि प्रतिवादी हे ग्रामपंचायतील सत्ताधारी गटातीलच असुनही सरपंच – उपसरपंच यांच्यातील अंतर्गत वाद सतत या ना त्या कारणाने जाहीरपणे चर्चेत राहतो आतापर्यंत गावापुरता सिमित असलेला त्यांच्यातील वाद हा थेट जिल्हाधिका – यांच्या कोर्टात पोहोचला असुन त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे