सातारा:-साताऱ्यात आमदार राणे निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस उतरले रस्त्यावर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात आमदार राणे निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस उतरले रस्त्यावर.
सातारा दि: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य भाजप आमदार नितेश नारायण राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांना धमकी दिली आहे .या धमकीचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
वास्तविक पाहता जनतेच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या पोलीस बांधवांनी सर्वांच्या बद्दल आपुलकी, माया व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत .अशा पोलीस बांधवांच्या एकेरी उल्लेख करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर करून चुकीची व बदनामी केलेली आहे. पोलीस बांधव कधीही बदलीला घाबरत नाहीत .परंतु, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडांचा त्यांना बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळेच नितेश राणे द्वेशभावनेतून आकासापोटी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी बदलीच्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या घरातील लोकांशी संपर्क होत नाही. अशा बदलीची चौकशी करावी व अन्यायकारक बदली बाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे.
या प्रकारामुळे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य खचले आहे. त्यांचा परिवार घाबरलेला आहे. सदर प्रकार हा निषेधार्थ असून आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या विरोधात केल्या वक्तव्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी करून सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी निषेध नोंदवला आहे.
बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे सुनील कांबळे, गौसपाक लांडगे, सदाशिव वायदंडे, नागेश घा, भिकाजीराव डमकले, राजेंद्र शितोळे, जयवंत कुलकर्णी, पटेल व अनेक सहकारी विशेषता विजय जाधव ,अशोक निकम ,किसन शिंदे, हेमंतकुमार राक्षे यांनीही निषेध नोंदवला आहे. यापुढे पोलीस बांधवांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी व संबंधितांना निवडणुकीत समाचार घेतला जाईल. असेही सेवानिवृत्त पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..