सातारा:-साताऱ्यात महाराणी येसूबाईंचा शौर्य दिन साजरा करण्याचा शुभारंभ.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात महाराणी येसूबाईंचा शौर्य दिन साजरा करण्याचा शुभारंभ.
सातारा दि: हिंदवी स्वराज्याच्या महाराणी येसूबाई ३२ वर्षानंतर औरंगाबाद येथून साताऱ्याला आल्या होत्या. याला आज तीनशे चार वर्ष पूर्ण झाली . त्यानिमित्त त्यांनी आणलेल्या मातीचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.अशी माहिती येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजे शिर्के यांनी दिली यांनी दिली आहे.
या ऐतिहासिक घटनेची नोंद घेऊन फाउंडेशनचे विश्वस्त धनश्री राजेमहाडिक, स्नेहल सुहास राजे शिर्के, शिल्पा सुरेश राजेशिर्के सुधा सुभाष राजेशिर्के व निलेश पंडित, जयंत देशपांडे, सुभाष राजेशिर्के, अविनाश कोळपे व प्रवीण शिंदे, निलेश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांना संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर कैदेत टाकण्यात आले होते.२९ वर्षे कैद होते. त्यानंतर दिनांक ४ जुलै १७१० साली माननीय येसूबाई छत्रपतींचे राजधानी असलेल्या साताऱ्यात परतल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. या घटनेला ३०४ वर्ष पूर्ण झाली आहेत .यानिमित्त सातारा येथील शिवतीर्थ या ठिकाणी महाराणी येसूबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पूजन करण्यात आले. सदरच्या घटनेची माहिती व इतिहास संशोधक शिल्पा परब यांनी माहिती दिली. यंदाचे हे पहिले वर्ष असून यापुढे मोठ्या प्रमाणात येसूबाई आगमन शौर्यदिन सर्व शिवप्रेमी व मावळ्यांना सोबत घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजे शिर्के यांनी दिली आहे.
_______________________________________
छाया- सातारा येथील महाराणी येसूबाई आगमन दिन साजरा करताना राजेशिर्के व राजेमहाडिक व मान्यवर (छाया – अजित जगताप, सातारा)