श्रीरामपूर:-अहमदनगरच्या ‘ अहिल्यानगर ‘ नामांतरास रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
अहमदनगरच्या ‘ अहिल्यानगर ‘ नामांतरास रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील …
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) नगर – जिल्हाला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून हे नाव देण्यात विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्हाच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचे महसुल तथा पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहिल्यानगर असे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला . नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत पुर्ण होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी करून अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आमल्या पत्रात नमुद केल्याने जिल्हाला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पुर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.