ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-( कळंभे)-सकल मराठा समाजाची बैठक व बिर शुक्रवार संपन्न.

पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

RPS STAR NEWS

वाई:-( कळंभे)-सकल मराठा समाजाची बैठक व बिर शुक्रवार संपन्न.

मौजे कळंभे ता.वाई जि.सातारा येथील सकल मराठा समाजाची बैठक व मार्गदर्शन शिबिर शुक्रवार दिनांक-30/8/2024 रोजी सायंकाळी श्री.मानाईदेवी मंदिर येथे संपन्न झाले. सदरील बैठकीमध्ये सर्वप्रथम कळंभे गावाचे गावकामगार तलाठी श्री.विक्रम पाटील व पाचवड विभागाचे मंडल अधिकारी श्री.जाधव साहेब यांची रोटेशन पध्दतीने इतर दुसय्रा तालुक्यात बदली व पदोन्नती झाली असल्याने व त्यांनी अल्पकालावधीत उत्कृष्ठ प्रकारे काम करून शासकीय योजना कळंभे गावातील अंत्यत गरजु व पात्र लाभार्थी यांना लाभ मिळणेकामी सर्वोतोपरी सहकार्य केलेबद्दल गावचे रीवाजानुसार शाल श्रीफळ भेटवस्तु देवुन सत्कार/सन्मान करून व निरोप देवुन पुढील वाटचालीस सदिच्छा देणेत आल्या.
तसेच कळंभे गावातील संजय गांधी अपंग पेन्शन योजनेचे लाभार्थी सौ.कविता रामदास सुतार यांना मंजुरी आदेशाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.त्याचप्रमाणे कळंभे गावातील पहिले सहा कुणबी दाखले श्री.सुरेश वामन शिवथरे व त्यांचे कुटुंबिय यांना प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे कळंभे गावातील कुणबी नोंदी सापडलेल्या अन्य कुटुंबिय यांना कुणबी जातीचा दाखला मिळणेकामी मोडी वाचक भाषांतर करणारे तहसिल कार्यालय वाईचे कर्मचारी व मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी श्री.पवार साहेब(कोरेगांव)व गावचे मार्गदर्शक श्री.सुरेश शिवथरे सर यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी कळंभे गावचे सरपंच सौ.निलम शिवथरे,उपसरपंच श्री.आबाजी सुतार,गावातील अन्य संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी ज्या नागरीकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे जुळवुन कुणबी दाखल्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.सदरचे मोडी वाचक पुढील फक्त दोन महिनेच तहसिल कार्यालय येथे उपलब्ध असल्याने आणखी वेळ न घालवता पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button