चोराडे:-(खटाव)-जि.प.शाळा नांदणीवस्ती येथे सखी सावित्री व पालक मिटींग उत्साहात साजरी….
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
RPS STAR NEWS
जि.प.शाळा नांदणीवस्ती येथे सखी सावित्री व पालक मिटींग उत्साहात साजरी….
पालकांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा – डॉ सुहास कुंभार.
सध्या मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होत आहे .विद्यार्थी मोबाईल जास्त, प्रमाणात वापरत आहेत तरी पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा व मुलांना जास्त वेळ मोबाईल देऊ नये याची सुरुवात स्वताःपासून करावी असे मत मत डॉ सुहास कुंभार यांनी व्यक्त केले.
सखी सावित्री समिती स्थापन करण्याची कारणे व सदरील समितीची कामे याची सविस्तर माहिती डॉ सुहास कुंभार यांनी दिली तसेच शाळेत व परिसरात CCTV बसवावा आपली मुले शाळेत जाताना व शाळेतून येताना त्यांच्यावर बारकाईने लक्ष्मू ठेवावे .
सध्या अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी घडून येत आहेत आपणही सावध असले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले काही माहिलांनी प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांचे व त्यांच्या शंकांचे निरसन केले. मिटींगला अध्यक्ष श्री सुभाष पवार, श्री कृष्णत पवार सौ शकिला मुल्ला, सौ कोडलकर सिस्टर उपस्थित होत्या. चहापान झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री पिसाळ यांनी सर्वांचे आभार मानले व मिटींग संपल्याचे जाहीर केले. मिटींग चांगल्या प्रकारे पार पडली.