ताज्या घडामोडी

सातारा:-कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांना घरी बसवा :- धैर्यशील कदम.

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांना घरी बसवा :- धैर्यशील कदम.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे-मोठे प्रकल्प सुरू आहेत वीज,पाणी, पूल,आरोग्य,रस्ते,शिक्षण आदि मूलभूत सुविधा उभारणीसाठी भारतीय जनता पार्टीची विकासाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सहकारमंत्री पद असताना देखील सातारा जिल्ह्यासाठी सोडा स्वतःच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी दखल घेण्यायोग्य एकही विकास काम विद्यमान आमदारांना करता आले नाही. अशा निष्क्रिय,नाकर्त्या आमदाराला येत्या निवडणुकीत घरी बसवा प्रतिपादन भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले.

हरपळवाडी ता.कराड येथील महाराष्ट्र शासनाच्या 2515 निधीतून 7 लक्ष रुपये मंजूर झालेल्या अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या विकास कामाचे भूमिपूजना प्रसंगी ते बोलत होते यावेळी कराड-उत्तर भाजपाचे नेते मनोज घोरपडे,भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील , पाल गावचे नेते विश्वास काळभोर, हरपळवाडीच्या सरपंच विजयाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.

कदम म्हणाले की, या अगोदर देखील हरपळवाडी गावासाठी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,अंगणवाडी इमारत बांधणे, साकव पूल बांधणे याकरिता 34 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध केला होता देशातील व राज्यातील सरकारवर जनतेचा विश्वास आहे अधिका अधिक वाढत आहे भारतीय जनता पार्टी कडे ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेबरोबर कार्यकर्त्यांची ओढ आहे येत्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपसरपंच बाळासाहेब गायकवाड, ग्रा.पं. सदस्य अरुण पवार,संतोष देशमुख, संजय पाटील, सुनील काळभोर,धनंजय घाडगे,दत्तात्रय संकपाळ, दत्तात्रय देशमुख, आनंदराव संकपाळ, सचिन तळेकर, दिलीप काळभोर, मानसिंग गायकवाड यांच्यासह हरपळवाडी गावचे ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button