क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाशिम:- वडिलांच्या  नावे असलेल्या घराची नोंद मुलाच्या नावे करण्यासाठी 6000 रूपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वाशिम:- वडिलांच्या  नावे असलेल्या घराची नोंद मुलाच्या नावे करण्यासाठी 6000 रूपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले.
वाशिम, दि. 19 (शफिक शेख):- येथील मांडवा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रेमानंद शामराव मनवार यांना तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या घराची नोंद तक्रारदार यांच्या नावे करण्यासाठी रक्कम रूपये 6000 ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांनी रंगेहाथ पकडले.
याबबात सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली घराची नोंद स्वतःच्या नावावर करण्यासाठी ते दि. 9/9/2022 रोजी ग्रामपंचायत मांडवा, वाशिम येथे गेले असता तेथील ग्रामसेवक प्रेमानंद शामराव मनवार यांनी यासाठी त्यांच्याकडे 6000 रूपयांच्या रकमेची मागणी केली. तक्रारदार यांनी त्यावेळेस 1000 रूपये आरोपीस दिले आणि उर्वरित रक्कम रूपये 5000 घर नावावर करतेवेळी देण्याचे ठरले.
तक्रारदार यांनी त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, वाशिम येथे ग्रामसेवक मनवार यांच्या विरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार दिनांक 14/9/2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधिक्षक गजानन आर. शेळके यांनी आपल्या सहका-यांसह सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मनवार हे जेव्हा तक्रारदार यांच्याकडून रक्कम रूपये 5000 ची लाच स्विकारत होते त्याच वेळेस लपून राहिलेल्या श्री. शेळके आणि त्यांच्या सहका-यांनी श्री. मनवार यांना रंगेहाथ पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आता पोलीस स्टेशन रिसोड जि. वाशिम येथे गुन्हा नोंदविण्यात आला
या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अरूण सावंत, अपर पोलीस आयुक्त देविदास घेवारे, अंमलदार पोहवा, नितीन टवलारकर, दुर्गादास जाधव, विनोंद मारकंडे, विनोंद अवगळे, योगेश खोटे, चापोना मिलिंद यांनी मोलाची कामगिरी बजावली.
यावेळी कोणाही ग्रामसेवकाने किंवा खासगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम. दूरध्वनी क्रमांक 07252/235933
टोल फ्री क्रमांक – 1064
गजानन आर शेळके – 9423338424.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button