ताज्या घडामोडी

पारनेर:-(अहिल्यानगर)`दैनिक अक्षराज’ चे पत्रकार वसंत रांधवण राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्काराने सन्मानित.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

`दैनिक अक्षराज’ चे पत्रकार वसंत रांधवण राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्काराने सन्मानित.

दि.८,पारनेर (अहिल्यानगर) : राज्यातील गरुड फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शनिवार दि.७ जून रोजी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथिल आण्णासाहेब शिंदे सभागृहात हा सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी दैनिक अक्षराज मिडियाचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आकाश पुजारी ( संस्थापक अध्यक्ष गरुड फाउंडेशन),पै. रावसाहेब (नाना) खेवरे ( जिल्हाध्यक्ष शिवसेना, उबाठा), संदिप भांड ( सहाय्यक पोलिस आयुक्त ), विजुभाऊ तमनर (जिल्हाध्यक्ष यशवंत सेना), रमेश खेमनर ( कार्याध्यक्ष,गरुड फाउंडेशन), बाळकृष्ण भोसले ( युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष),प्रेमानंद महाराज (शास्त्री) आंबेकर, नामदेव पाटील (तहसीलदार), पत्रकार जावेद शेख, बबनराव घुमटकर, प्रमोद दिवेकर मधुकर घाडगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते.
वसंत रांधवण यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात मागिल १६ वर्षापासून सातत्याने भरीव सामाजिक कार्य करत आहेत. तसेच पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकार असून निर्भिडपणे ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ,आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, दैनिक अक्षराज मिडियाचे मुख्य संपादक विनोद गोरे, सहसंपादीका प्राजक्ता गोरे -चव्हाण, पत्रकार राजकुमार ईकडे, टाकळी ढोकेश्वर परिसरासह तसेच पारनेर तालुक्यातील राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button