
कराड नगरीत सर्वधर्म समभावाचे प्रतिक साजरे
कराड, दि. ५ : (रफिक शेख)
कराड शहरपरिसरात शिवजयंती, रमजान ईद, बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती, व अक्षय तृतीया इत्यादी हिंदू व मुस्लिम सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
पारंपारिक शिवजयंती उत्सवानिमित्त कराड शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते हा शिवजयंती सोहळा व दरबार मिरवणूक पाहण्यासाठी कराड शहर व परिसरातील शिवभक्त शिवप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमी शिवभक्तांना शिवसेना कराड शहर व मुस्लिम समाज बांधव कराड शहर यांच्या वतीने सीलबंद पेयजल व कोल्ड्रिंक्स चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात, माजी नगरसेवक मजहरभाई कागदी,माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक फारूकभाई पटवेकर, बशीर भाई कारभारी,शिवसेना दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशीद पाटील,शशिकांत हापसे,शिवसेना कराड शहरप्रमुख शशिराज करपे,
शिवसेना उपशहरप्रमुख अक्षय गवळी
शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष ज्योतीराम साळी सर
युवा सेनाचे शंभूराज रैनाक, मयूर देशपांडे, बरकतभाई पटवेगार,रफिक भाई मुल्ला,अॅॅड. संदीप तलाठी, शकिलशेठ कारभारी आदि उपस्थित होते.
शिवसेना आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सुध्दा हजर होते, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले