ताज्या घडामोडी

सातारा:-सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने पक्ष वाढीसाठी दि २१ ते २३ फेब्रुवारी रोजी झंजावाती दौरा…..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत)

सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने पक्ष वाढीसाठी
दि २१ ते २३ फेब्रुवारी रोजी झंजावाती दौरा…..

सातारा दि
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनीकर्म,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई व शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख चंद्रकांत जाधव व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी झंजावाती दौरा आयोजित केलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील शिवसेना संघटना मजबूत बांधणी,शिवकार्य सदस्य नोंदणी, आगमी स्थानिक स्वराज संस्था व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका शिवसेना उमेदवार चाचपणी संदर्भात आणि शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून त्याच्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे व पालकमंत्री यांच्या कडे संपर्कप्रमुख यांच्या मार्फत सातारा जिल्हा दौऱ्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.या झंझावती जिल्हा संपर्क दौरा शिवसेना पक्ष वाढीसाठी तसेच शिवसैनिकांना सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण दौरा ठरणार असून या दौऱ्यात
श्री.चंद्रकांत (दादा) जाधव ( जिल्हाप्रमुख सातारा)श्री.एकनाथ दादा ओंबळे(सहसंपर्क प्रमुख, सातारा जिल्हा)श्री.वासुदेव काका माने मा.नगराध्यक्ष रहिमतपूर, जेष्ठ शिवसैनिक).श्री.निलेश निकम (जिल्हाप्रमुख, सैनिक आघाडी).सौ.शारदाताई जाधव
(जिल्हाप्रमुख महिला आघाडी,सातारा)सुलोचनाताई पवार
(उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, सातारा)श्री.निलेश मोरे(शहरप्रमुख, सातारा)श्री.विजयराव पाटील
(कार्यालयप्रमुख, सातारा) बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेच्या या सातारा जिल्हा दौऱ्याची रूपरेषा पुढील प्रमाणे. शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी
स. १०.३० वा. – मेढा (विश्रामगृह, मेढा)
दु. १२.३० वा. – महाबळेश्वर (विश्रामगृह,महाबळेश्वर)
दु. ३.०० वा. – खंडाळा (विश्रामगृह, खंडाळा)
दु. ५.०० वा. – लोणंद (विश्रामगृह, लोणंद) त्यानंतर फलटण राखीव व मुक्काम असणार आहे.
शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी
स. १०.०० वा. – फलटण (फलटण,विश्रामगृह)
दु. १.०० वा. – दहिवडी (दहिवडी, विश्रामगृह)
दु. ४.०० वा. – म्हसवड (म्हसवड, विश्रामगृह)
दु. ६.०० वा. – वडूज (वडूज, विश्रामगृह)

खटाव तालुक्यातील. वडूज राखीव व मुक्काम होणार आहे.
रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी
स. १०.०० वा. – औंध (विश्रामगृह, औंध )
दु. १२.०० वा. – मसूर
दु. ३.०० वा. – कराड (कराड,विश्रामगृह)

दु. ५.०० वा. – ढेबेवाडी

सायं. ७.०० वा. – पाटण (विश्रामगृह, पाटण)

सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी

जिल्हा दौरा सांगता – वेळ कळवली जाईल. अशी माहिती शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी शासकीय विश्राम ग सातारा येथे झालेल्या पत्रकारांच्या चर्चेच्या वेळी दिली आहे.

तरी या दौऱ्यात शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख,विधानसभासंघटक, तालुकाप्रमुख,शहरप्रमुख, शहरसंघटक,उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख,उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पुरुष/महिला, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सर्व शासकीय कमिटी सदस्य व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अशी विनंती करण्यात आलेली आहे.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फोटो — शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button