आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-(स्वारगेट) – सौ.सुशीलाबेन शहा ट्रस्ट व भारत विकास परिषद यांच्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य दिनी जनकल्याण रक्तपेढीत रक्तदान शिबीर संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

सौ.सुशीलाबेन शहा ट्रस्ट व भारत विकास परिषद यांच्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य दिनी जनकल्याण रक्तपेढीत रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सौ.सुशीलाबेन मोतीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट व भारत विकास परिषद, स्वारगेट च्या वतीने दि.15 ऑगस्ट 24 रोजी जनकल्याण रक्तपेढी, स्वारगेट ,पुणे येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत दरवर्षीप्रमाणे रक्तदान श्रेष्ठदान याला अनुसरून रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये 51 चे वर रक्तदात्यानी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास परिषद चे जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा,प्रवीण दोशी, वैज्ञानिक दशरथ, रतन माळी,वासुदेव केंच,दीपक गुंदेचा, शैलेश शहा, सौ.सुशीलाबेन शहा ,सुषमा कोंडे,सुविधा नाईक, अंजली चव्हाण,शिल्पा खंडागळे, संजय कटारिया ,गणेश बाहेती, जनकल्याण रक्तपेढी चे अतुल कुलकर्णी , संतोष अंगुलकर आणि फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीची जाणीव या उक्तीला अनुसरून दरवर्षी प्रमाणे वयाची 85 शी पार करूनही समाजसेवक मोतीलाल व सुशिलाबेन शहा समक्ष हजर राहून रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी आपल्या सुनील, मनोज मुलांसह हजर राहतात ही गोष्ट सर्वांना प्रेरणा देणारी आणि आम्हा सर्वांना त्यांच्या कार्याला नमन करणारी आहे पुढे ढोक म्हणाले की जास्तीतजास्त लोकांनी व तरुणांनी पुढे येऊन आपल्या या राष्ट्रीय सणाचे व महापुरुषांचे जयंती, पुण्यतिथीचे औचित्य साधून असे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.
अतुल सलागरे यांनी प्रास्ताविक मद्ये मोतीलाल शहा व भारत विकास परिषद गेल्या 20 वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवितात त्यापैकी आजचा दरवर्षी प्रमाणे रक्तदान सोहळा महत्वाचा असतो. तर भारत विकास परिषद चे स्वारगेट शाखेचे अध्यक्षा सुषमा कोंडे यांनी पुढील वर्षभर चालणारे उपक्रमाविषयी माहिती देऊन सहभाग घेण्याचे आवाहन केले.
हे शिबिर यशस्वी पार पडण्यासाठी स्वतः रक्तदान करून श्रवणी व श्रद्धा कुलकर्णी, अभय व पुष्कर साठे,दीप्ती व संधिर डपुरकर,रीचा व निखिल गोखले,सुरभी व राहुल बापट, डॉ.हर्षाली पाटील,डॉ.आशुतोष कुलकर्णी,सुनील शहा,अतुल सलागरे,शिल्पा खंडागळे, किरण त्रिवेदी,विनोद मुंडे ,तसेच मनोज शहा व सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि जनकल्याण रक्तपेढी चे सर्व स्टाफ यांनी मोलाची मदत केली.शेवटी आभार समीक्षा सलागारे हिने मानले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button