ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत असेलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत असेलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी.
अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गांतर्गत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दि १० रोजी पाहणी केली. मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून तो लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी खोपोली ते कुसगाव पर्यंत होणाऱ्या या मार्गिकेच्या प्रकल्पाला भेट देऊन सुरु असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सदर चा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button