कोरेगाव:-आ. शिंदे यांच्या कुशीत बिलगला चिमुकला.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आ. शिंदे यांच्या कुशीत बिलगला चिमुकला.
कोरेगाव दि: मुलं ही देवाघरची फुले असतात. म्हणूनच बच्चे मनके सच्चे सारे जग के आखो के तारे.. असे त्याचे वर्णन करतात. अशाच एका लहानग्या चिमुकल्यांमुळे माथाडी कामगार नेते व माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे सुद्धा भारावून गेली होते .कारण आमदार शिंदे यांच्या कुशीत या चिमुकल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले .
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वाड्या- वस्ती व प्रत्येक गावामध्ये लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे हे नेहमीच तत्पर असतात. काल सायंकाळी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आमदार शिंदे हे कुमठे गावात आले होते. या ठिकाणी कोरगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी ते आले. त्यावेळी दहा महिन्याच्या चिमुकल्या सूर्यवर्धनकडे पाहून त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. ते चिमुकले सुद्धा त्यांच्या कुशीत अलगद विसावले. त्या चिमुकलेला आमदार शिंदे यांच्याकडून घेण्यासाठी त्याचे आजोबा श्री. राजाभाऊ जगदाळे हे पुढे आले. त्यानंतर त्याचे वडील दिग्विजय जगदाळे यांनी सुद्धा त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते चिमुकले आमदार शशिकांत शिंदे यांना सोडण्यास तयार नव्हते .त्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांनी सुद्धा त्या चिमुकल्याला आपल्या हृदयाशी घट्ट पकडून कुमठे ग्रामस्थांशी संवाद साधला. आ. शिंदे हे लोहचुंबकासारखे सारखे आहेत त्यांच्या सोबत. कुठलाही लोखंड तथा लोह त्यांना पकडून ठेवतात. पण बीड हा असा धातू आहे की तो लोहचुंबकाला चिटकून राहत नाही. अशा प्रकारे अनेकांनी त्याचा अनुमान काढला अर्थात ही राजकीय भाषा आहे. सूर्यवर्धन या चिमुकल्याने तसेच त्याची आत्या बहीण असलेल्या चिमुकल्या राजनंदीनी रणनवरे या दोन चिमुकल्यांना आ. शशिकांत शिंदे यांनी जवळ घेऊन आपल्यातील मातृत्व दाखवले . समाज माध्यमातून याचे चित्रीकरण सुमारे दीड लाख लोकांनी पाहिले व लाईक केले. त्यांच्या ममतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सातारा जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे, राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष अतुल शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सातारा तालुका युवक अध्यक्ष मंगेश ढाणे, कोरेगावचे नितीन लवंगारे खटावचे ज्ञानेश्वर जगताप व माण राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष प्रशांत विरकर यांच्यासह श्रीमती नलिनी जाधव व मान्यवरांनी आ. शिंदेंच्या या चिमुकल्याच्या भेटीचे मनापासून कौतुक केले आहे…………………………
………
फोटो आमदार शशिकांत शिंदे यांना बिलकुल राहिलेला चिमुकला सूर्यवर्धन (छाया अजित जगताप- कोरेगाव)