आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरेदीचा प्रस्ताव सादर करावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

RPS STAR NEWS

आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरेदीचा प्रस्ताव सादर करावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवा.

 

सातारा दि. 30 : – शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरदीचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर बैठकीचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या यंत्रसामुग्रीच्या खरेदी प्रस्तांवाना निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, नागरिकांना आरोग्यविषयक आणखीन चांगल्या सेवा द्या. तसेच ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या महिलांच्या प्रसुतींची संख्या वाढवावी. सध्या जिल्ह्यात चांगला डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध समाज माध्यमे, शाळा, महाविद्यालय तसेच ग्रामीण भागात जनजागृती करावी. यामध्ये उद्योगांचेही सहकार्य घ्यावे.
*बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवा*
बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. हे डॉक्टर शोधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवावी.
ज्या तालुक्यात बोगस डॉक्टर आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात यावा. बोगस डॉक्टर आढळून आल्यास दवाखाना तात्काळ सील करावा. पोलीस विभागाने तपास करुन कठोर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button