गंगापूर शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत … सीसीटीव्ही मुळे गुन्हेगारीला आळा बसेल…पालकमंत्री अब्दुल सत्तार.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
गंगापूर शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत …
सीसीटीव्ही मुळे गुन्हेगारीला आळा बसेल…पालकमंत्री अब्दुल सत्तार
गंगापुर ता.२८
गंगापूर येथे पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज २८ जुलै रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले. गंगापूर शहरातील २२ ठिकाणी नाईट व्हिजन व उच्च क्षमतेसह सुसज्ज सुरक्षा ११५ कॅमेरे बसवण्यात आले
या सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन सोळाव्या विशेष पोलीस छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार .गोपीभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप भागवत .उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड .तहसीलदार सतीश सोनी. माजी आमदार कैलास पाटील .फजल चाऊस. पोलीस निरीक्षक कुमारसिग राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होते
यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी पालकमंत्री असताना साडेचार कोटी निधी उपलब्ध करून दिला या निधीतून गंगापूर पोलिसांनी शहरातील २२ ठिकाणी नाईट व्हिजन व उच्च क्षमतेस सुसज्ज सुरक्षा ११५ कॅमेरे बसवण्यात आले. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही कॅमेरे वॉच ठेवून पोलीस जनतेला स्पीकर वरून सूचनाही देणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली पुढे बोलताना सांगितले की निजामकालीन पोलीस स्टेशनच्या जागेवर हायटेक पोलीस स्टेशन तयार करण्यात येणार असून प्रत्येक शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून पोलीस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून पोलीस संख्या वाढवण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू याप्रसंगी व्यापारी संतोष आबिलवादे, रामेश्वर नावंदर, रमेश तापडिया आदींची उपस्थिती होती.