आ.मकरंद पाटिल याचा अजित पवार यांना पाठिंबा.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई प्रतिनिधी
आ.मकरंद पाटिल याचा अजित पवार यांना पाठिंबा.
आमदार मकरंद पाटील यांचा अजितदादा पवार यांना पाठिंबा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राज्यामध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत असल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. त्यामुळे आमदार मकरंद आबा पाटील यांचा पाठिंबा शरद पवार यांना असल्याचे निदर्शनास आले.
परंतु आमदार पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विचारून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे जाहीर केले. मतदार संघातील विकास कामे व शेतकऱ्यांच्या तसेच कारखान्याच्या विविध प्रश्नासाठी कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार यांच्याबरोबर जाण्याचे आमदार मकरंद आबा पाटील यांना कळवले त्यामुळे आज सायंकाळी आमदार मकरंद पाटील यांनी 200 कार्यकर्त्यांसह अजित दादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला.
आमदार मकरंद पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला परंतु आमदार पाटील यांच्या निर्णयाचे वाईच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदारसंघांमध्ये शरद पवार यांना मानणारा गट देखील मोठा आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान आमदार पाटील यांना पेलावे लागणार आहे.