कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह निमित्ताने गणितीय मूलभूत संख्यज्ञान संबोध अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह निमित्ताने गणितीय मूलभूत संख्यज्ञान संबोध अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शालेय परिपाठामध्ये सामुदायिक निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.
कु. गौरी राठोड, पायल इचके, प्रणिता शिंदे, अंजली पवार या विद्यार्थिनींनी गणितामधील विविध शोध लावणारे गणितज्ञ यांच्याविषयी माहिती सांगितली.
उपशिक्षक श्री. प्रकाश मदने सरांनी गणित व त्यातील मूलभूत संबोध याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
उपशिक्षक श्री.अतुल डोके सरांनी विविध गणितीय कोडी घेवून मनोरंजनातून गणिताविषयी गोडी निर्माण केली.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी गमतीशीर खेळ घेतले. छोट्या छोट्या खेळातून गणित शिकता येते हा संदेश याद्वारे दिला.
गणितीय संगीत खुर्ची या खेळातून संख्या वाचन, स्थानिक किंमत व विस्तारित रूप या संकल्पना दृढ झाल्या.या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, क्रीडा शिक्षक रवींद्रनाथ मोहिते सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.