खटाव:-मायणी परिसरावर अवकाळी चे ढग; द्राक्ष रब्बी पिकांचे नुकसान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी परिसरावर अवकाळी चे ढग; द्राक्ष रब्बी पिकांचे नुकसान.
मायणी प्रतिनिधी—मायणी परिसरावर गेले दोन दिवस अवकाळीचे ढग फिरत असून या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती याचाच परिपाक म्हणून आज बुधवार सायंकाळी साडेपाच वाजता पावसाच्या सरी हिवाळ्यात बरसल्या या हिवाळी पावसामुळे मायणी परिसर पूर्ण गारठला असून रब्बी पिके, द्राक्ष बागायत व पशुधन यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले कलेढोण ला द्राक्ष बागावर संकट—–ढगाळ वातावरणामुळे कलेढोण परिसरावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हा परिसर पूर्णपणे गारठला असून द्राक्ष बागावर भुरी व डावण्या रोगास पोषक वातावरण तयार झाले आहे मुख्य हंगामातील द्राक्ष हार्वेस्टिंगचा कालावधी जवळ आला असताना द्राक्ष बागायतदारासमोर नवे संकट उभा राहिले आहे या परिसरात सुमारे सातशे एकरावर निर्यात क्षम द्राक्ष उत्पादन घेतले जाते प्रत्यक्ष मालाची निर्यात होईल हा कालावधी केवळ आठ दिवसावर आला असताना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यात चिंतेची भर पडली आहे असे द्राक्ष बागायतदार अतुल यलमर यांनी सांगितले.