सातारा:-साताऱ्यात खा. सुळे यांना यशस्विनी सामाजिक अभियान अंतर्गत खाद्यपदार्थ भेट देणार..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात खा. सुळे यांना यशस्विनी सामाजिक अभियान अंतर्गत खाद्यपदार्थ भेट देणार..
सातारा दि: माता-भगिनी, युवती यांच्यासाठी विधायक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. या कार्यासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करणाऱ्या सौ .खा. सुप्रियाताई सुळे यांना सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ भेट देणार असल्याची माहिती यशस्विनी सामाजिक अभियान जिल्हा समन्वयक सौ. समिंद्रा बापूराव जाधव यांनी दिली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ खाद्यपदार्थ महिला बचत गटाने तयार केलेले आहेत. या खाद्य पदार्थांची एक लाख रुपयांची यशस्वी विक्री त्यापूर्वीच झालेली आहे. सौ खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नाने साताऱ्यातील विसावा नाका व राधिका रस्त्यावरील रिलायन्स मॉल मध्ये हे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत .यामध्ये दर्जेदार साहित्यातून तयार करण्यात आलेले पापड, लोणचे, लाडू, (शेंगदाणा, डिंक ,नाचणी) शेवया, भाकरवडी, चकली, चटणी तसेच विविध खाद्यपदार्थ महिला बचत गटाकडून तयार करण्यात आलेले आहेत.
या खाद्यपदार्थांना मोठी मागणी होत आहे . सातारा जिल्ह्यात महिला बचत गटाच्या खाद्यपदार्थांना वस्तूंना विक्री करण्यासाठी शुभारंभ व त्याबाबत मार्गदर्शन सौ .खा. सुप्रियाताई सुळे यांनी केल्यामुळेच महिला बचत गटाला यश संपादन करता आलेला आहे. याची जाणीव ठेवून सातारा जिल्ह्याच्या वतीने यशस्विनी सामाजिक अभियान अंतर्गत या ७५ खाद्यपदार्थांची टोकरी भेट देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी सातारा जिल्हा समन्वयक सौ समिंद्रा बापूराव जाधव, सौ स्वाती विकास निंबाळकर , सौ आशा जनक जाधव, सौ उज्वला रामचंद्र संकपाळ, श्रीमती नलिनी जाधव, सौ. प्रज्ञा गायकवाड,सौ रेखा फुटाणे, सौ. अंबिका देशमाने, सौ हेमलता निंबाळकर ,सौ. तेजस्विनी केसरकर, सौ. वैशाली जाधव सौ. उषा शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अतुल शिंदे, स्वप्निल वाघमारे यांचेही सहकार्य लाभलेले आहे.
शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा या ठिकाणी सदरच्या खाद्यपदार्थ एकत्रित करून त्याच्या टोकरी तयार करून ठेवलेले आहेत. उद्या रविवारी गुरुपौर्णिमा दिनांक २१ जुलै रोजी कराड येथील यशवंत नगर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या सातारा दौऱ्यात महिला बचत गटाच्या वतीने त्यांना हे खाद्यपदार्थ भेट देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना राबविण्यात येत असले तरी खऱ्या अर्थाने सर्वच महिलांना सक्षम करण्याची भूमिका यशस्विनी सामाजिक अभियान अंतर्गत होत आहे. ही आनंदाची बाब असल्याचे मत महिला वर्गाने व्यक्त केले आहे…. ————————————————
फोटो- खासदार सुप्रिया सुळे यांना भेट देण्यासाठी खाद्यपदार्थाची बांधणी करताना महिलावर्ग (छाया- निनाद जगताप सातारा )