पुणे निगडी:-मदनलाल धिंग्रा मैदानात जिल्हास्तरीय टेनिस बॉल स्पर्धा संपन्न.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मदनलाल धिंग्रा मैदानात जिल्हास्तरीय टेनिस बॉल स्पर्धा संपन्न.
निगडी, दि. 18 (शफिक शेख):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर टेबल टेनिस स्पर्धा दिनांक 14 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 अखेर मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाल्या 14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुली यांचे 133 शाळांमधील 665 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. क्रीडा पर्यवेक्षक श्रीरंगराव कारंडे उपस्थित होते., पंचप्रमुख श्री चंदर थावानी, संदीप शर्मा यांनी पंचाचे कामकाज पाहिले. सुभाष जावीर, मंगल जाधव यांनी स्पर्धा आयोजन केले. युवराज गवारी, बाळू काळभोर, विलास लांडे यांनी सहकार्य केले.
17 वर्षे मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक इंदिरा नॅशनल स्कूल, ताथवडे विजयी विरुद्ध अक्षरा इंटरनॅशनल
स्कूल, वाकड (3-2), जिया शहा (इंदिरा), 2) साई कीर्ती (इंदिरा), 3) तनिष्का शिंदे (इंदिरा), 4) साई कीर्ती (इंदिरा), 5) जिया शहा ( इंदिरा). द्वितीय क्रमांक —-अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड, तृतीय क्रमांक— युरो स्कूल वाकड
19 वर्षे मुले अंतिम निकाल – प्रथम क्रमांक सिटी प्राईड जूनियर कॉलेज निगडी विजयी विरुद्ध इंदिरा नॅशनल स्कूल तथावडे. 1) यश थाकन (इंदिरा), 2) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड), 3) शुभंकर राऊळ (सिटी प्राईड). 4) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड), 5) प्रयाग शेट्टी (सिटी प्राईड). द्वितीय क्रमांक– इंदिरा नॅशनल स्कूल ताथवडे. तृतीय क्रमांक– जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी
19 वर्षे मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक — जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी, द्वितीय क्रमांक —-इंटरनॅशनल स्कूल ताथवडे.