श्रीरामपूर:-श्री क्षेत्र मोहटा देवी येथे वासंतीक ( चैत्र ) नवरात्रोत्स उत्साहात सुरू …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री क्षेत्र मोहटा देवी येथे वासंतीक ( चैत्र ) नवरात्रोत्स उत्साहात सुरू …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी येथे आज चैत्र पाडव्याच्या दिवसापासून वासंतीक ( चैत्र ) नवरात्रोत्सव सालाबादप्रमाने श्री मोहटा देवीची विशेष महापुजा करून मोठ्या उत्साहात सुरू झाला.
श्री क्षेत्र मोहटा स्वयंभु श्री मोहटा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे . श्री क्षेत्र मोहटा गडावर भव्य – दिव्य मंदिर भाविकांनी आर्कशक ठरत आहे . दरवर्षी चैत्र पाडवा म्हणजेच गुडी पाडवा हा हिंन्दुचा नववर्षाचा पहिला दिवस पाच दिवसापासून श्री मोहटा देवीचा वसंतीक नवरात्रोत्सव सुरू होतो भाविकांना लवकर . सुरळीत व शांततेत श्री मोहटा देवीचे दर्शन व्हावे यासाठी श्री जगदंबा देवी ट्रस्ट मोहटे यांचे अध्यक्ष विश्वस्त व व्यवस्थापक आणि सर्व यंत्रणा यांनी अतिषय सोयिस्कर दर्शनाची व्यवस्था केली आहे.
भर उन्हाळ्याच्या दिनसातही भाविक आई जगदंबा मोहटा देवीच्या दर्शनासाठी सह कुटुंब . सहपरिवार गर्दो करत आहे . श्री मोहटा देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर समोर जगदंबा मोहटा देवीची प्रसन्र मुर्तींचे दर्शन घेवून भाविक पुढील जीवनाचे व वाटचालीसाठी आई जगदंबेचा शुभ आर्शिवाद घेवून समाधानी होत आहेत.