पुसेसावळी:-(खटाव)-चोराडेत ‘भैरोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर…. गुलाल, खोबऱ्याची उधळण : हजारो भाविक-भक्तांची गर्दी….
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
RPS STAR NEWS
चोराडेत ‘भैरोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर….
गुलाल, खोबऱ्याची उधळण : हजारो भाविक-भक्तांची गर्दी….
पुसेसावळ:- चोराडे (खटाव) येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री भैरवनाथाची यात्रा गुलाल खोबऱ्याची उधळण करून सासनकाठ्या नाचवून ‘श्री भैरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अष्टमी दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो, यादिवशी देवाची विधिवत पूजा करून पोशाख बांधण्यात येतो. त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यास फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी देवाची आरती करून देवाची पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर या सोहळ्यामध्ये परिसरातील नवसाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या होत्या.या सोहळ्यात प्रचंड गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली.
यामध्ये हजारो भाविकासह गावकरी व मुंबईकर मंडळी यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात मिठाई दुकाने, आकाश पाळण्यामुळे यात्रा परिसर गजबजलेला होता. श्री भैरवनाथ पालखी मिरवणुकीत पुजारी व देवाचे मानकरी सहभागी झाले होते. मिरवणुकीत लेझीम, गजी, सनई, बँड, घोडा, देवाचा मानदंड होता.तर युवकवर्ग सासनकाठ्या नाचवण्यात दंग झाले होते. भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गुलालाची उधळण करण्यात आल्याने अवघा आसमंत गुलालमय झाला होता.तर सासनकाठ्या ग्राम प्रदक्षिणेसाठी रवाना झाल्या. भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि भैरवनाथाचा गजर केला. भाविकांनी पालखीवर नारळ व नोटांची तोरणे अर्पण केली. यात्रेत तमाशा, कुस्त्या, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी…सकाळपासून चोराडेसह रहाटणी, वांझोळी, शेनवडी, म्हासुर्णे, वडगाव, उंचीठाणे, या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविक- भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन