पारनेर:-अखंड हरीनाम सप्ताह सोहळा- श्री क्षेत्र अपधुप! (समाज प्रबोधक ,ह,भ,प, निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन!)
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अखंड हरीनाम सप्ताह सोहळा- श्री क्षेत्र अपधुप!
(समाज प्रबोधक ,ह,भ,प, निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन!)

पारनेर; राजकुमार इकडे
दि,१ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील अपधुप येथील श्री खंडेश्वर देवस्थान ,व पांडुरंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने अखंड हरीनाम सप्ताह सोहळा पार पाडला,
कार्यक्रमासाठी पारनेर सह नगर तालुक्यातील पंचक्रोशीतील भावीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्र भर नाव लौकीक असलेले ,समाजाच्या अंतकरनापर्यत पोहचुन पांडुरंगाची सेवा कशी घडेल ते सांगणारे समाजप्रबोधक ह,भ,प, निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये गेली १३ वर्षे सतत कार्यरत असलेली दिनदर्शिकाचे मोफत वाटप करण्यात आले.सदर दिनदर्शिकेत विशेष म्हणजे पारनेर,नगर,श्रीगोंदा तालुक्यातील दुर्मिळ अशा मंदीराचे फोटो,व त्या मंदीराविषयी सखोल माहीती ह्या दिनदर्शिकेत वर्तवली गेली आहे.हेच ह्या दिनदर्शिकेचं वैशीष्ट मानलं जातं!
कार्यक्रमाचा आरंभ संतोष पानसरे,आणी सुप्रियाताई गवळी यांच्या मधुर वानीतुन भक्ती गीतांचे दर्शन घडले,
सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी साई उद्योग समुहाचे सुरेशशेठ गवळी,किसन साहेबराव गवळी,लक्ष्मण गवळी,(मा,पो,अधिक्षक),किसन भगवंत गवळी(मा,सरपंच),बन्शी गवळी,संतोष गवळी,दिनदर्शिकेचे संपादक अर्जुन येणारे!प्रकाशक तुकाराम कातोरे अदि ग्रामस्त, महीला वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.




