राहुरी:-स्वराज्य पोलीस मित्र. पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना धर्माडी गेस्ट हाऊस राहुरी येथील बैठक संपन्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
स्वराज्य पोलीस मित्र. पत्रकार संरक्षण
आणि माहिती अधिकार संघटना
धर्माडी गेस्ट हाऊस राहुरी येथील
बैठक संपन्न.
काल दि ०१/०१/२०२३ रोजी राहुरी येथे औरंगाबाद व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी काही व ठराविक पदाधिकारी यांची बैठक पार पडली. सुरवातीला बैठकीत एक जाणवले की मी नागपूर मधे आहे की राहुरी मधे आहे ते. इथे नागपूर चा उल्लेख यासाठी केला आहे की आताच हिवाळी अधिवेशन संपले तिथे जसे आरोप प्रत्यारोप झाले तसेच इथेही झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवट *गोड* झाला आहे हे पण तितकेच महत्वाचे आहे. आता थोडे फार उन्नीस बिस होतेच पण तुम्हाला एक सांगतो संघटना चालवायची किंवा संघटने मध्ये काम करायचे म्हटले तर तर काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते अगदी मान अपमान सह.
सुरूवातीला सर्वांचे मनापासून स्वागत करण्यात आले त्यानंतर सौ श्वेता व्हनमाने मॅडम यांचा पुनश्च प्रवेश करुन त्यांना विश्वस्त पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना योग्य तो पर्याय देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादकरांचे संघटन बघुन मीच थक्क झालो आणि त्यात सोलापूरकरांची भर होतीच. एकंदरीतच काय तर मिटींग छान झाली आणि औरंगाबाद व सोलापूर मधुन ठराविक पदाधिकारी पंढरपूर येथील मिटींग मध्ये उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे माझ्या शब्दाखातर (आदेशानुसार नाही) योगेशजी पाटील व हारुनभाई शेख यांनी सोलापूर टिम ला योग्य ते मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे विशेष आभार मानले पाहिजेत ते भरतजी नजन साहेबांचे कारण नजन साहेबांनी अगदी चोखपणे मिटींग ची व्यवस्था केली होती. या बैठकीत उपस्थित असणारे पदाधिकारी आता काही नांवे माहिती नाहीत त्याबद्दल क्षमा मागतो. याबैठीकीस मा भरतजी नजन, योगेश पाटील, संतोष जावळे, हारुनभाई शेख,अशोक खरमाळे, योगेश सुराणा शेठ, डॉ देवेंद्र शिंदे,सोनाली कुसाळकर, समीरभाई शेख, योगिता कवडे, सोनाली भोसले व प्रशांत नाना जोशी यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले. या बैठकी साठी सोलापूर वरुन विलास अरळी सुवर्णा कटारे हेमलता म्हेत्रे अफरिन गजघोटे विशाल जोगदंड, तर पुणे शिरूर येथुन आलेले प्रफुल्ल कुळकर्णी शास्त्री औरंगाबाद येथुन मुन्नाभाई (मजनु) पठाण, बंडुभाऊ पांचाळ, राजुभाऊ चांदवड, संतोष साळुंके, शिवाजी त्रिभुवन, युवराज कदम, राहुल फुलावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.