
सातारा___कलेढोण बस सेवा सुरू करा मागणी प्रतिनिधी___गेली पन्नास वर्षे कोरेगाव आगाराची सातारा वडूज कलेढोण सदरची बस सेवा संपकाळात बंद झाल्याने ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी विभागीय वाहतूक अधीक्षक मोहन महाडिक यांच्याकडे केली आहे खटाव तालुका हा सातारा जिल्ह्यातील दक्षिणेकडे दक्षिणेकडील शेवटचे टोक आहे या तालुक्यातील प्रवासी आपल्या सरकारी कामासाठी कोर्टकचेरी साठी शासकीय कामासाठी जिल्हा परिषद कामासाठी सातारला जातात व याच गाडीने मुक्कामी घरी येतात याशिवाय वडूज खटाव पुसेगाव सातारा या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरची बस अत्यंत महत्त्वाचे आहे तरी कोरेगाव आगारप्रमुख व विभागीय अधीक्षक मोहन महाडिक यांनी सदरची बस विनाविलंब सुरू करावी अशी मागणी संपूर्ण खटाव तालुक्यातून होत आहे