कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्यसैनिक वै.ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्यसैनिक वै.ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला.
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्यसैनिक वै.ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री गाडगे महाराज व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मां. प्रा. प्रवीण रणबागले , सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा यांच्या व्याख्यानाने गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते-पाटील होते. कार्यक्रमासाठी वै.जिजाबा मोहिते पाटील यांच्या सुकन्या श्रीमती विजया जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व स्वातंत्र्यसैनिक वै.ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजनाने झाली.
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी गायलेल्या संदेशगीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
उपशिक्षक श्री.महेशकुमार बोभाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला.
दरम्यान आज जागतिक मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यसैनिक वै.ह.भ.प जिजाबा मोहिते पाटील सोहोलेकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. जिजाबा मोहिते पाटील व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यातील मैत्री व क्रांतिकारी चळवळीतील अनेक प्रसंग सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक मा.प्रा. प्रवीण रणबागले सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा व अधिकाराचा वापर समाज व शिक्षणासाठी केला त्यामुळेच आज बहुजन समाज विकासाच्या मार्गावर आला असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा श्री मधुसूदन मोहिते पाटील दादा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराज समाजहितासाठी जगले, समाजहिताचे अनेक आदर्श नियम त्यांनी घालून दिले त्यामुळे सामाजिक समतेचा पाया घातला गेला असे सांगून जिजाबा मोहिते पाटील यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.रमेश घोलप व आभार श्रीमती सरिता सावंत यांनी मांनले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन