कर्जाचा विषय निघताच चेअरमन ने वार्षिक सभेतून काढला पळ. *शिक्षक समिती आक्रमक….
अभिजित लेंबे सातारा :- 98228 83516

कर्जाचा विषय निघताच चेअरमन ने वार्षिक सभेतून काढला पळ.
शिक्षक समिती आक्रमक….
पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभेप्राथमिक शिक्षक बँकेची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिक्षक समितीच्या आक्रमक धोरणामुळे केवळ दहा मिनिटात संपवावी लागली.
बँकेतील भ्रष्टाचाराचे,चेअरमन यांच्या अनियमित कर्जाचे ,बोगस कर्ज प्रकरण असे अनेक मुद्दे शिक्षक समितीने लावून धरल्याने प्रश्नांची उत्तरे देऊ न शकलेले व हतबल झालेले चेअरमन यांना दहा मिनिटात सभा संपल्याचे जाहीर करून पळावे लागले.
सत्ताधारी चेअरमन व त्यांच्या संचालकांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा निषेध करून सातारा जिल्हा शिक्षक समितीने प्रति सभा घेतली.
यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. बँकेतील भ्रष्ट प्रवृत्ती बाजूला सारून बँक ब वर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी शिक्षक समितीला हे शिवधनुष्य हाती घ्यावे लागेल असे ते म्हणाले. जिल्ह्यातील सभासद शिक्षक समितीच्या विचारांशी एकरूप झाल्याने परिवर्तन होणारच आहे असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी प्रति सभेत गेल्या सात वर्षांतील भ्रष्ट कारभाराचे अनेक दाखले पुराव्यासहित शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, शिवाजी शिंदे ,सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे यांनी दिले.यामध्ये विद्यमान चेअरमन यांचे बेकायदेशीर कर्ज, कराड शाखेतील बोगस कर्ज प्रकरण, विशिष्ट एका सेवानिवृत्त ला दिलेले वाढीव कर्ज, संगणक देखभालीसाठी कोट्यावधी खर्च, नोकर भरतीत केलेला भ्रष्टाचार व परजिल्ह्यातील भरलेली मुले, बँकेत चाललेल्या जेवणावळी, सन 2019 – 20 चा लाभांश न देणे, बँकेला झालेला रिझर्व बँकेचा दंड यासारखे अनेक मुद्दे पुराव्यासहित दाखवण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे वार्षिक सभेत विचारल्याबद्दल शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच परिवर्तन अटळ आहे म्हणून परिवर्तनासाठी तन मन धन अर्पून सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी केले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे, माजी चेअरमन विश्वास चव्हाण, विठ्ठल माने,प्रदीप कदम,विठ्ठल फडतरे, सतीश नलवडे,संजय नांगरे,उदय नाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेन्द्र कुमार घाडगे,गजानन वारागडे, अनिल पिसाळ,मोहनराव सातपुते,बाळकृष्ण कुंभार, संतोष घोडके, एम.डी.दडस,डी.डी. ढेबे,चंद्रकांत कांबळे,अनिल डोईफोडे,तसेच विविध तालुक्यांचे अध्यक्ष अनिल चव्हाण,अरुण पाटील,सुरेश चिकणे,भगवंतराव कदम,नितीन शिर्के,अर्जुन यमगर,विनायक चव्हाण,तानाजी यादव,भाऊसाहेब दानवले,राजेंद्र कदम यासह शशिकांत बागल,नेताजी जगताप,किसन खताळ,तानाजी वाघमोडे,अंकुश नांगरे, धीरेश गोळे,संतोष शिंदे
असे शिक्षक समितीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.