ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी गावची वाहतूक कोंडी कायमची नष्ट होणार____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मायणी गावची वाहतूक कोंडी कायमची नष्ट होणार____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.

मायणी प्रतिनीधी__मायणी हे खटाव तालुक्यातील व्यापारी पेठेचे गाव असून या गावातील बस स्थानक मध्यवर्ती गावात असल्याने वाहतुकीची कोंडी गेली पाच दशके सुरू होती याबाबत मायनी ग्रामपंचायतीने वडूज पोलीस स्टेशन विभागीय पोलीस अधिकारी माण यांना अहवाल पाठवला होता हा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुख यांना प्राप्त झाला असून त्यांनी 28 सप्टेंबर रोजी च्या मध्यरात्रीपासून पार्किंग व्यवस्था केली आहे ती पुढील प्रमाणे___मायणी गावातून राज्यमार्ग क्रमांक 143 हा भारत माता विद्यालय ते दत्ता तांबवेकर यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटल पर्यंत जातो या मार्गावर बस स्थानक रुग्णालय शाळा कार्यालय बँका पतसंस्था व्यापारी पेठ दुकाने असल्याने कायमचा वाहतुकीचा अडथळा होतो त्यामुळे वाहतूक ठप्प होते त्यातच लहान-मोठे अपघात होतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात हा प्रश्न सोडवण्यासाठी सम विषम तारखेला वाहने पार्किंग करून हा प्रश्न काही प्रमाणात सोडवला आहे मल्हार पेठ रस्त्याच्या उत्तर बाजूस सम

तारखेला वाहने पार्किंग करता येतील तर विषम तारखेला दक्षिण बाजूस वाहने पार्किंग करता येतील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ते चांद नदी या मिरच्या सम तारखेला पूर्वेस व विषम तारखेला पश्चिमेस वाहने उभी करता येतील यामुळे पार्किंगचा प्रश्न मिटेल व वाहतूक सुरळीत होईल त्याचप्रमाणे मायणी बायपास रस्त्यासाठी अडीच कोटी मंजूर झाले असून हा रस्ता सहा महिन्यात आम्ही पूर्ण करणार आहोत असे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर व युवा नेते सचिन गुदगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button