कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा मुख्यधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी -विजय सोनवणे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा मुख्यधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी -विजय सोनवणे.

सातारा दि: सातारा नगरपालिका कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत सातत्याने आंदोलन करत आहेत. याबाबत यापूर्वीच्या अनेक सातारा नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत .पण सध्या आंदोलन घंटागाडी कामगारांना बदनामी करण्यासाठी काही प्रवृत्तीला हाताशी धरले जात आहे. त्यामुळे सातारचे प्रामाणिक व कामगारांचे हिताचे निर्णय घेणारे मुख्याधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी. अशी मागणी विजय सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून कंत्राटी कामगार व जनता क्रांती दलाचे नेते सत्यवान कमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे पदाधिकारी विजय सोनवले, अक्षय भिसे, राणीताई किरतकर्वे व दत्ता केंगार, रोहिणी लोहार आणि घंटागाडी कंत्राटी कामगार ऊन- वारा- पावसाची तमा न बाळगता आंदोलन करत आहेत. हे आंदोलन लोकशाही मार्गाने चालत असून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बदनाम केले जात आहे. असे आरोप ही श्री सोनावले यांनी केलेला आहे.
दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा प्रशासन व सातारा नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर साताऱ्यातील सर्व कंत्राटी घंटागाडी कामगार हे कचरा संकलित करून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकतील. असा इशारा देण्यात आलेला आहे.
——————————————-
फोटो- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायालयाच्या प्रतीक्षेत बसलेले आंदोलन व घंटागाडी कामगार (छाया- मृणाल देवकुळे, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button