वाई :-दिशा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रा मार्फत घेण्यात आलेल्या मोफत कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई :-दिशा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रा मार्फत घेण्यात आलेल्या मोफत कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद.
दि ८ प्रतिनिधी वाई
दिशा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने आगामी काळात होणार्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या साठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग उपस्थित होता
प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक दिशा अकॅडमी चे संस्थापक डाॅ नितीन कदम यांनी स्पर्धा परिक्षेत नियोजन आणि त्यानुसारच अंमलबजावणी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेतली पाहिजे विद्यार्थींनी वेळेचा अपव्यय न करता येणाऱ्या संधीचे सोने केले पाहिजे स्पर्धेचे बदलेले स्वरुप मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका व परिक्षा भिमुख अध्ययन याची योग्य सांगड घालून तयारी करणे आवश्यक असल्याचे सांगितले ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन खर्चिक अध्ययन करण्या पेक्षा दिशा अकॅडमी मध्ये असणार्या अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा होण्यासाठीच या विभागाची स्थापना केल्याचे सांगितले
या वेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा शशिकांत येवले सर यांनी केंद्रीय परीक्षांचे स्वरुप अभ्यास पद्धती हिंदी व्याकरणाची तयारी बहुपर्यायी पद्धती मध्ये होणार्या चुका याविषयी मार्गदर्शन केले.