मायणी:-(खटाव)-सहकार, उद्योग आणि समाजसेवेचा दीपस्तंभ — स्व.प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली—–
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सहकार, उद्योग आणि समाजसेवेचा दीपस्तंभ —
स्व.प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली—–

मायणी प्रतिनिधी
येथील शिवप्रताप उद्योग समूह आणि शिवप्रताप मल्टीस्टेटचे संस्थापक, सहकार क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व व समाजसेवक स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विटा येथे आदरांजली कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक श्री. पंकज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी दादांच्या कार्याचा गौरव करत म्हटले — “सहकार ही केवळ आर्थिक रचना नसून सामाजिक परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. स्व. प्रतापशेठ दादांनी ही चळवळ प्रत्यक्ष आयुष्यात उतरवून दाखवली. पारदर्शकता, विश्वास आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर आधारित त्यांची कार्यपद्धती आज प्रत्येक पतसंस्थेसाठी आदर्श आहे. त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण केला.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यकारी संचालक अॅड. मा. विठ्ठलराव साळुंखे यांनी दादांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेत सांगितले — “दादांनी संघर्षातून उभे राहून समाजासाठी कार्य केले. त्यांचे ध्येय केवळ उद्योग उभारणे नव्हते, तर लोकांना स्वावलंबी बनवणे हे होते. त्यांनी सहकाराला सेवाभावाशी जोडून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवले.” यानंतर मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. सुरेश पाटील यांनी सांगितले की, “दादा हे समाजकारणात नेहमीच सामाजिक उत्तरदायित्व जपत कार्य करणारे नेते होते. त्यांचा प्रत्येक निर्णय लोकहिताचा आणि समाजहिताचा असे. ”धनवडे तात्या यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी दादांनी घेतलेल्या पुढाकारांची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, “शेतकरी, लघुउद्योजक आणि सामान्य वर्गासाठी दादांनी उभारलेल्या योजना आजही प्रेरणादायी आहेत.” दीपक पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून दादांच्या माणुसकीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत सांगितले, “दादांचे विचार पत्रकारितेलाही दिशा देणारे ठरले. ते नेहमी लोकांशी जोडलेले राहिले. ”तर रामचंद्र गुरव यांनी म्हटले की, “शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना दिलेली सेवा, पारदर्शक व्यवहार आणि आपुलकीची वागणूक हीच दादांची खरी ओळख होती.”
या प्रसंगी आनंदराव जंगम यांना राष्ट्रपती पदक आदर्श पोलीस पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि धनंजय जाधव यांची सांगली जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल शिवप्रताप मल्टीस्टेट तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दादांविषयीचा आदर, अभिमान आणि सहकारभाव झळकत होता. दादांचा सहकारातून समाजसेवेचा वारसा पुढील पिढ्यांनी जपावा, असा सर्वांनी संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाला श्री. मुरगाप्पा सगरे, श्री.प्रभाकर सगरे, श्री. शंकर कोरे, श्री. शंकर (नाना) मोहिते, श्री. अशोक साळुंखे , श्री. विजय साळुंखे, श्री. प्रताप सुतार, श्री. राजेश शहा, श्री.शरद शहा, श्री. विक्रम लकडे,सौ.राणी कदम, सौ. माधुरी कदम, डॉ. गौरी साळुंखे, श्री. रामचंद्र गुरव (सर), श्री.राजन सावंत, श्री.सुनिल मुळीक आणि सभासद वर्ग, शिवप्रताप मल्टीस्टेटचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद तसेच साळुंखे परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तेजस्वी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. हणमंतराव पाटील यांनी केले.




