राहाता तालुक्यात बोगस बी बियाणे व वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई साठी छावा संघटने तर्फे कृषी अधिकारी यांना निवेदन.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
RPS STAR NEWS
राहाता तालुक्यात बोगस बी बियाणे व वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई साठी छावा संघटने तर्फे कृषी अधिकारी यांना निवेदन.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय करण भाऊ गायकर यांच्या आदेशाने व अहिल्यानगर शिर्डी जिल्हाध्यक्ष अवि दादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोगस बी बियाणे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे राहाता तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचे किमतीपेक्षा वाढीव दराने विक्री केली जाते व बिलही दिले जात नाही.त्याच प्रमाणे दुकानात कोणती खते उपलब्ध आहेत याचेही फलक लावलेले नसतात.असले तरी त्यावर कोणत्या खताची काय किंमत आहे हेही लिहिलेलं नसत.त्यामुळे ग्राहकाला कोणत्या खताची काय किंमत आहे हे माहित नसत.त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी पैशाची लुटमार होत असते.या सर्व बाबींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा भविष्यात छावा संघटने तर्फे मोठे आंदोलन करणार याचे निवेदन कृषी अधिकारी यांना देण्यात आले राहता पंचायत समिती समवेत तालुकाप्रमुख संभाजी गवांदे युवा तालुकाप्रमुख नितीन अनारसे शिर्डी शहर प्रमुख संदीप गुंजाळ, राहुल शिंदे, संदीप वाघ, आकाश गाडे, उमेश पुरी, वैभव गांगुर्डे किरण गांगुर्डे प्रहार तालुका संघटक वसंत काळे,अभिजित कालेकर आदि उपस्थित होते.