खटाव:-मायणी परिसरात दोन हजाराच्या नोटा व्यवहारातून बाजूला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
मायणी परिसरात दोन हजाराच्या नोटा व्यवहारातून बाजूला.
मायणी प्रतिनिधी_रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करून असलेल्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्याचे आदेश दिल्याने पेट्रोल पंप ,कापड दुकानदार ,हॉटेल चालक ,मेडिकल स्टोअर्स ,दवाखाने ,विविध कंपन्यांची दुकाने या ठिकाणी दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांची ग्राहकांची परवड सुरू झाली आहे बँकेने सध्या नोटा बदलून देण्याचे काम चालू केले नसून खात्यात पैसे जमा करण्याचे सांगितले आहे. आणि खात्यात पैसे जमा झाल्यानंतर एक दिवसानंतर पैसे काढा असे अधिकारी सांगतात. त्यामुळे ज्यांच्याकडे दोन हजाराच्या एक दोन नोटाच आहेत त्यांची मात्र परवड सुरू झाली आहे. तर व्यवसायिकांनी या नोटा स्वीकारून पुन्हा स्वतः बँकेत भरल्या तर काहीही अडचण येणार नाही. परंतु व्यवसायिक जबाबदारी घ्यायला तयार नाही तरी रिझर्व बँकेने 30 सप्टेंबर पर्यंत व्यवहारात नोटा चालू ठेवाव्यात,अशी मागणी होऊ लागली आहे.