आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे घवघवीत यश.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि. 23
बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे घवघवीत यश.

 

बारावी बोर्ड परीक्षेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ८८.१५ टक्के लागला आहे. यामध्ये विशेष अभिमानाची बाब म्हणजे २२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व १२४ विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल ९६.०० टक्के लागला असून यामध्ये अडसूळ हर्षद गणेश व कु. निकम तनुजा अजय या विद्यार्थ्यांनी ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. पिसाळ देशमुख पियुषा कल्याण या विद्यार्थीनीने ८३.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय व कु. महाडिक श्रेया सुरेश या विद्यार्थीनीने ८२.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल ८९.३६ टक्के लागला असून यामध्ये कु. पवार श्रुती विकास या विद्यार्थीनीने ८८.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सपकाळ रोशनी सुनील या विद्यार्थीनीने ८६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. भोसले अदिती संतोष या विद्यार्थीनीने ८५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कला शाखेचा निकाल ६६.४७ टक्के लागला असून यामध्ये कु. यादव अक्षदा संदीप या विद्यार्थीनीने ८५.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. मेंगडे कृषिका नितीन या विद्यार्थीनीने ७५.५० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. भणसे पूजा सुभाष या विद्यार्थीनीने ७४.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य , सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डाॅ. गुरुनाथ फगरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. विवेक सुपेकर, पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे, कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button