मुंबई:- सावधान सावधान विजय मंसाराम चव्हाण आणि साथीदार दिपक यांनी मिळून पंजोबाच्या काळातील सोन्याच्या नाण्याचे आमिष दाखवून बेस्ट ड्राइव्हरला घातला नऊ 9 लाखाचा गंडा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
मुंबई:- सावधान सावधान विजय मंसाराम चव्हाण आणि साथीदार दिपक यांनी मिळून पंजोबाच्या काळातील सोन्याच्या नाण्याचे आमिष दाखवून बेस्ट ड्राइव्हरला घातला नऊ 9 लाखाचा गंडा.
मुंबई:- बेस्ट ड्रायव्हर संदेश गोविंद उनवरकर रा.मुंबई वैयक्तिक कामासाठी आपल्या गावी महाड येथे जाऊन परत मुंबईला येताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला हात केला असता संदेशनी गाडी थांबवून विचारणा केले असता मला मुंबईपर्यंत लिफ्ट द्या तुमचे काय असेल ते भाडे देतो असे बोलून त्या इसमाने म्हणजेच विजय मंसाराम चव्हाण राहणार उमरगांव त्याने संदेश कडून लिफ्ट घेतली. प्रवासामध्ये बोलता बोलता मी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो वडील आजारी आहेत. म्हणून गावी जात आहे असे सांगितले.6.30 pm च्या आसपास नवी मुंबई येथे विजय चव्हाण उतरला. या प्रवासामध्ये दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले होते. दुसऱ्या दिवसापासून मोबाईलवर संपर्क चालू झाला. यादरम्यान माझ्या एका परिचित व्यक्तीकडे जवळजवळ दोन ते अडीच किलो पणजोबाच्या काळातील सोन्याची नाणी आहेत. असे विजय मन्साराम चव्हाण यांनी संदेश ला सांगितले.ती अर्ध्या किमतीत द्यावयाचे आहेत. कोणी असेल तर सांगा असे सांगून फोन ठेवला. संदेशनी त्या नाण्याचे सॅम्पल मागितले सॅम्पल पारखले असता ते खरे निघाले. विश्वास बसल्यामुळे बेस्ट ड्रायव्हर संदेश यांनी बेस्ट सोसायटी मधून नऊ लाख रुपये कर्ज उचलून त्यांनी बोलावलल्या ठिकाणी म्हणजेच खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पोहोचले. विजय मन्साराम चव्हाण याचा साथीदार दीपक यांनी आम्हाला सांगितले की मुंबईवरून काही लोक किडनी काढण्यासाठी आले आहेत आम्हाला खूप भीती वाटत आहे. जलका तैली येथे भेटा. तेथे पोहोचलो असता शेतातून ते बाहेर आले आणि आमच्या हातातून पैशाची बॅग घेऊन अर्धा किलो सोन्याचे नाणे असलेली थैली आमच्या हातात देऊन तेथून तात्काळ पळून गेले. त्याचे बिल देतो बोलूनही त्यावेळी त्यांनी बिल न देता नंतर देतो असे सांगून तेथून पोबारा केला. त्यातून संदेश आणि मित्र मुंबईला परत आल्यावर सोन्याची नाणी चेक करण्यासाठी सोनाराकडे गेले असता ते खोटे असलेले समजले. तेव्हा लक्षात आले की नऊ लाखाला खोटे बोलून विजय मन्साराम चव्हाण आणि दीपक या दोघांनी मिळून लुटले आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक खामगाव ग्रामीण जिल्हा बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही आज तागायत विजय मन्साराम चव्हाण राहणार उमरगांव तालुका आकोट जिल्हा अकोला याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नसून त्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नाही. बेस्ट ड्रायव्हर संदेश यांचे असे म्हणणे आहे की पोलीस प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी हे त्यांना सामील आहेत त्यामुळे गुन्हा नोंद करून घेतला नाही. उडवा उडवी ची उत्तर देत राहिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेशने विनंती केली आहे की अशा समाजघातकी समाजकंटकांना लोकांच्या आर्थिक फसवणूक करून आयुष्यातून उध्वस्त करणाऱ्या विजय मन्साराम चव्हाण आणि दीपक यांना ताब्यात घेऊन यांच्यावर गुन्हा नोंद करून मला न्याय मिळवून द्यावा आणि इतर नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी.
फोटोमधील या व्यक्तीपासून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी सावधान व्हावे आणि संदेश यांची आर्थिक फसवणूक झाली त्या पद्धतीने कोणाचीही होऊ नये. यासाठी सावधान सावधान सावधान!
टिप:-महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला अशा आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून जनतेला वाचवण्याचे काम , लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन. काबाड-कष्ट करणाऱ्या लोकांच्या आयुष्याची पुंजी सहजरीत्या लोकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणार करणाऱ्या अशा व्यक्तींना जेरबंद करून मुस्क्या आवळाव्यात असे पीडित व्यक्तीचे पोलीस प्रशासनाला आवाहन.