सातारा-( भुईंज)-किशोरवयीन मुलांचे २ दिवसीय जागरूकता कार्यशाळा.
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
किशोरवयीन मुलांचे २ दिवसीय जागरूकता कार्यशाळा. (Sensitization Workshop of Adolescent Boy’s)
दिनांक – १४/०५/२०२४ ते १५/०५/२०२४
ठिकाण – सन्मान केंद्र भुईंज, ता. वाई ,जि. सातारा
सहभागी (Participants) – ३९
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था , निर्भया प्रकल्प मार्फत भुईंज विभागातील किशोरवयीन मुलांची २ दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा निर्माण संस्थेमार्फत आयोजित केली आहे. या कार्यशाळे साठी भुईंज विभागांतील सायगाव, बेलमाची, सरताळे, अमृतवाडी आणि भुईंज (भीमनगर) येथील किशोरवयीन मुले उपस्थित होते.
दोन्ही दिवसाच्या प्रशिक्षणनाचे प्रशिक्षक श्री. संजय साठे सर यांचे स्वागत गटातील मुलाच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांनी प्रशिक्षणास सुरुवात केली.
■ दिवस पहिला –
सर्वात प्रथम त्यांनी हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने सुरुवात केली. त्यानंतर एकमेकांसोबत स्व-ओळखं करून घेण्यात आले व तसेच वेगवेगळ्या गावांमधून / वस्तीमधून आलेल्या मुलांनी एकत्र व्हावे व एकमेकांची ओळख व्हावी यासाठी खेळ घेण्यात आला.
त्यानंतर स्वतः मध्ये असणारे सुप्त गुण ( जिद्द ,चिकाटी,धाडस, संयम, स्वाभिमान, आज्ञाधारक, स्वावलंबी, प्रेमळ ,विज्ञानवादी )
इत्यादी अनेक गुण ओळखायचे खेळ घेऊन मुलांना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर नातेसंबंध यावरती मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
स्वतःभोवती असणारे (मैत्रीचे , आईवडिलांशी, समाजातील किंवा वैयक्तिक आयुष्यातील) नातेसंबंध कशा पद्धतीने जपता येतील या बद्दल मुलांना ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्यात आले, त्यानंतर जीवन कौशल्य (समस्या निराकरण, निर्णय क्षमता , स्व जाणीव, ताणतणावाची समायोजन, भावनांची समायोजन, चिकित्सक विचार, समानभूती व सहानुभूती) इत्यादी विषयावर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
नेतृत्व विकास प्रशिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या मुलांमध्ये दोन गट करून खेळाच्या माध्यमातून खेळ घेऊन (हार बनवणे) नेतृत्व विकास याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
■ दिवस दुसरा –
लिंगभाव यामध्ये मुलांना पुरुषांनी स्त्री असण्याचे फायदे व तोटे व त्यामध्ये होणारे भेदभाव व पुरुष आणि स्त्रियांमध्ये शारीरिक बदल व भावनिक बदल आणि यामध्ये होणारे भेदभाव इत्यादी विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरवयीन बदल यामध्ये ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये किशोर अवस्थेमध्ये होणारे शारीरिक बदल व भावनिक बदल याविषयी मुलांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.
बाल अधीकार यामध्ये मुलांना मार्गदर्शन करताना मूल जन्माला आल्यापासून ते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जे अधिकार लावलेले आहेत जसे की (जीवन जगण्याचा हक्क,विकासाचा हक्क, संरक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क, सहभागाचा हक्क ) इत्यादी अनेक अधीकार बद्दल मुलांना मार्गदर्शन करण्यात आले
मुलांना कार्यशाळेमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे खेळ व चळवळीतील गाणी एकत्रित घेण्यात आली. यांनंतर शेवटी मुलांना आजचे प्रशिक्षण कसे झाले या बद्दल चर्चा करण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक विक्रांत मोरे तसेच रमेश पुजारी, सुचिता सातपुते व चांदणी चंदनशिवे हे उपस्थित होते.