सातारा:-शाहूपुरी गंगासागर कॉलनीमध्ये मुलांनी साजरा केला आई सोबत मदर डे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
शाहूपुरी गंगासागर कॉलनीमध्ये मुलांनी साजरा केला आई सोबत मदर डे.
सातारा दि: राजा तिन्ही जगाचा आईविना भिकारी… या उक्ती प्रमाणे आई म्हणजे संपूर्ण जग. या जगाची काळजी घेण्यासाठी शाहूपुरी येथील गंगासागर कॉलनी मधील मुलांनी आपला आईचा सन्मान व सत्कार करण्यासाठी काल मदर डे साजरा केला. या वेळी केक ,फराळ व शीतपेय पाहून आई असलेल्या महिलांनाही आपल्या मुलांचे कौतुक करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
शाहूपुरी येथील गंगासागर कॉलनी येथील वयोवृद्ध माता श्रीमती संजीवनी माने तसेच सौ कल्पना जगताप, सौ अमृता माने व सौ सुजाता गुजर आणि सौ सुदेशाना मोरे यांचा डोक्यावर मुकुट व केक कापून बच्चे कंपनीने आनंद उत्सव साजरा केला. आई या दोन शब्दांमध्ये आत्मा व ईश्वर आहे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ काळजी घेणारा देव म्हणून आईसारखे पवित्र मंदिर कुठेही नाही. त्यामुळे मुलांनी या मंदिरातील देवाचे आशीर्वाद हवे असतील तर त्या मंदिराची ही काळजी घ्यावी. असे यावेळी सांगण्यात आले. सदरचा कार्यक्रम करण्यासाठी कुमारी अंकिता जगताप, श्री माने, सार्थ माने व शतयू गुजर, सिद्धांत मस्के, प्रणव पवार, निनाद जगताप यांनी परिश्रम घेतले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच अल्पोहार वाटप करण्यात आले.