ताज्या घडामोडी

राहता:-सावळीविहीर बुद्रुक येथे 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभिकरण व विविध कामांचा उद्घाटन समारंभ! ना. राधाकृष्ण विखे पा. व इतर मान्यवरांची राहणार उपस्थिती!

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:- 7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालया समोर होणार आहे. अशी माहिती सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून  सात कोटी 78 लाख रुपये खर्चून सावळीविहीर बुद्रुक येथे काही विविध विकास कामे करण्यात आली व काही करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार दि. 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून महानंदाचे अध्यक्ष राजेश (आबा )परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती बाळासाहेब जनार्दन जपे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ नंदाताई तांबे ,सौ हिराबाई कातोरे, गोदावरी बायो. लि. चे संचालक सुहास गोडगे, जि. प. मा. सदस्य रोहिणीताई निघुते, श्याम माळी, कविताताई लहारे, पुष्पाताई रोहम, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पं. स.चे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, माजी सरपंच सौ रूपाली ताई आगलावे, उपसरपंच गणेश नारायण कापसे, माजी उपसरपंच वृषालीताई जपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी.के गुंजाळ, देविदास धापटकर, पोलीस पाटील संगीता सुरेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा वाजता सावळीविहीर बु. ग्रामपंचायत समोर होणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच ओमेश जपे, उपसरपंच विकास जपे, तसेच ग्रा.पं. सदस्य गणेश आगलावे, सागर आरणे, आशिष आगलावे, दत्तात्रय आगलावे, दिलीप गायकवाड, संतोष कसबे, सौ रूपालीताई संजय जपे, सौ केशरबाई सदाफळ, सौ शैलाताई पवार, सौ मीनाताई बनसोडे, सौ अनुजाताई जपे ,सौ सुवर्णाताई नितनवरे ,सौ सुजाताताई भोसले, सौ आशाताई कोठारी, ग्राम विकास अधिकारी संतोष निवृत्ती सोनवणे, तसेच सा.वि .बु.सोसायटीचे चेअरमन कैलासराव सदाफळ,
व्हा.चेअरमन किशोर आगलावे व सोसायटीचे संचालक ओमेश जपे, रमेश आगलावे, शांताराम जपे, दिलीप जपे, राजेंद्र जपे ,सुनील साहेबरावआगलावे, सुरेश वाघमारे, राजकुमार गडकरी, सुनील रामदास आगलावे, सौ प्रमिलाताई जपे, सौ सुनंदाताई मातेरे, स्वीकृत संचालक सुरेश जपे, मारुती कापसे,सचिव संतोष वाघमारे आदींसह सर्व सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थ यांनी केले आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button