ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी परिसरात दमदार पाऊस बळीराजा सुखावला__
प्रतिनीधी:- दिलिप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख

मायणी परिसरात दमदार पाऊस बळीराजा सुखावला____माईनी प्रतिनिधी__दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मायनी परिसरात काल रात्री दिनांक 31 रोजी सायंकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड वाऱ्यासह विजेचा कडकडाट सह दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे नेहमी दरवर्षी उन्हाळी वळीव स्वरूपाचा पाऊस होतो परंतु यंदा पाऊस नसल्याने हवेमध्ये उष्णता वाढली होती खरीप हंगामाच्या मशागतीसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता होती यासाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता पण काल रात्री अचानक प्रचंड वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे असाच एक आणखी पाऊस झाल्यावर पेरणीपूर्व मशागतीची पूर्ण होतील व खरीप हंगाम मला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल असे मानसिंग माळवे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले