राहता:-माणसं जोडणारे व्यक्तिमत्व हरपले : स्व.दिलीप कडू पा.( दादा )
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
माणसं जोडणारे व्यक्तिमत्व हरपले : स्व.दिलीप कडू पा.( दादा )
राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथील एक शांत, संयमी, हसतमुख, धार्मिक स्वभाववैशिष्ट्ये असलेले व्यक्तिमत्व अर्थात स्व. दिलीप गोरक्षनाथ कडू पा. यांचा उद्या दशक्रियाविधी. त्यानिमित्त त्यांच्या स्वभाव गुण व कार्यकर्तृत्वाचा हा ओझरता लेखप्रपंच…
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखान्याचे संचालक असलेले स्व. दिलीप कडू पा. हे पद्मविभूषण मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील व स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या सेवेत २० वर्षे होते. अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने त्यांची सेवा केली. त्यानंतर पद्मश्री विखे कारखान्यात ११ वर्ष ते कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते. तिसगाव ग्रामपंचायतचे ते माजी सदस्य होते.
अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले स्व. दिलीप कडू पा. हे घरामध्ये, गावामध्ये व परिसरात ” दादा ” नावाने सुपरिचित होते. घरामध्ये ते सर्वात थोरले होते. स्वतः सातवीपर्यंत शिकलेल्या दादांनी आपली दोन मुले आशिष व अक्षय यांना उच्च विद्याविभूषित केले. त्यांचे तीन बंधू विजय, जिजाभाऊ आणि संजय यांना त्यांनी सदैव आपुलकीने वागविले. सर्व नातेवाईकांमध्ये त्यांचे अत्यंत घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. स्वभाव चांगला असल्याने दादांचा जनसंपर्क प्रचंड मोठा होता. माणसे जोडण्याची त्यांच्याकडे कला होती. मायाळू स्वभाव असल्याने त्यांनी कधीही कुणाचे मन दुखविले नाही.
गुरुदेव दत्त महाराजांचे ते निस्सीम भक्त व सेवेकरी होते. त्यांनी आपल्या शेतात सुंदर असे दत्त मंदिर उभारले. दोन महिन्यापूर्वी या मंदिरात मूर्तीप्राणप्रतिष्ठा केली. धार्मिक स्वभावाच्या दादांनी आयुष्यात भारतभर सर्व तीर्थस्थळी तीर्थाटन केले.
अशा निर्गर्वी, विनम्र आणि समाजाभिमुख जीवन जगलेल्या दिलीप कडू पा. ( दादा ) यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगटदिनी जगाचा निरोप घेतला हे विशेष. त्यांना दशक्रियाविधीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली !