पुणे:-सामाजिक न्याय मंत्रालय केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनांचा लाभ देणे विषयीची माहिती.
प्रतिनिधी:-विवेकानंद साळुंखे सातारा:-8766964989

आज दिनांक २४ ऑगस्ट 2022 रोजी सामाजिक न्याय मंत्रालय केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त भटक्या जाती जमातीतील समाजाला विविध योजनांचा लाभ देणे विषयीची माहिती देण्यासाठी समाजातील प्रमुख प्रतिनिधी सोबत मीटिंग विधानसभा भवन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. सभेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्र सरकारमधील असंख्य सदस्य सचिव उपस्थित होते.. यावेळी विमुक्त भटक्या जमातीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये उपराकार *माननीय लक्ष्मण माने, सुषमा अंधारे, एडवोकेट पल्लवी रेणके असे अनेक जणांनी समाजाच्या व्यथा व अडीअडचणी मांडल्या आहेत. वैदू समाज विकास फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. प्रदीप गुडे, कार्याध्यक्ष श्री.नारायण शिंदे सर, पुणे जिल्हाध्यक्ष श्री.तुकाराम शिंदे, ज्येष्ठ नेते सिद्धू काका शिंदे, हिंगोली चे अध्यक्ष श्री सुरेश धोत्रे, चतुर्शिंगी चे श्री स्वामी धनगर सर, केडगाव चे श्री.गोविंद शिंदे, श्री.विनोद पवार इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी वैदू समाजाच्या शैक्षणिक विषयी, नोकऱ्या संदर्भातील, घरकुल संदर्भातील असे अनेक अडीअडचणी विषयी निवेदन श्री.नारायण शिंदे यांनी तयार करून, वैदू समाजाच्या वतीने, *महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य सचिव माननीय श्री. नरेंद्र आहेर यांना देण्यात आले.
Great work, best
Thanku so much sir