आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव :-ब्रह्मपुरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कोरेगाव :-ब्रह्मपुरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते – पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व्याप्ती महान असून आपल्या देशासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे असे सांगितले.
यावेळी सुरुवातीला उपशिक्षक श्री.महेशकुमार बोभाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर , सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.