जीवनाला दिशा देण्याचे काम ज्योतिषच करते- आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले.
प्रतिनीधी:- दिलीप पुस्तके सातारा विभाग प्रमुख

जीवनाला दिशा देण्याचे काम ज्योतिष च करते______आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मायणी प्रतिनिधी___माझ्या आईवडिलांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता वाळवेकर गुरुजींना माझी आई घरी बोलून घ्यायची ज्योतिष शास्त्र हे जीवनाला दिशा देण्याचे काम करते हे मला बालपणीच समजले होते याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे आजही प्रत्येक घरात पंचांग पाहिले जाते नव्वद टक्के लोकांचा पंचांग यावर विश्वास आहे मात्र आजची पिढी या शास्त्रात पासून दूर चालली आहे असे मला वाटू लागले ज्योतिषाने आपले काम प्रामाणिक केले तर या शास्त्राबद्दल समाजात अजूनही विश्वास निर्माण होईल असे स्पष्ट मत आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन वर्ष दुसरे गोंदवले येथे बोलताना व्यक्त केले या अधिवेशनात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आद्य शंकराचार्य विद्या नरसिंह भारती करवीर पीठ कोल्हापूर होते याप्रसंगी पंचांगकर्ते मोहन दाते ज्योतिष पंडित रमणलाल शहा किसन पुजारी ज्ञानेश्वर भोर डॉक्टर विकास खिलारे चंद्रकांत शेवाळे जयश्री बेलसरे अशा ज्येष्ठ तज्ञ ज्योतिषांची उपस्थित होती प्रारंभी या अधिवेशनाचे आयोजक नंदकुमार जोशी यांनी सांगितले की नवीन ज्योतिषांना तज्ञ ज्योतिषांचे मार्गदर्शन व्हावे एकत्र चर्चा करून निर्णय व्हावा या उदात्त हेतूने खटाव-माण सारख्या दुष्काळी भागात हे अधिवेशन भरवले आहे प्राचार्य रमणलाल शहा यांनी सांगितले की ज्योतिषी अध्यात्मशास्त्र आहे आज दहा माणसे एकत्र येत नाहीत पण आज आपण एकत्र येऊन गुन्हा गुन्हा गोविंदाने राहूया मनामध्ये द्वेष मत्सर असता कामा नये चंद्रकांत शेवाळे यांनी सांगितले की अधिवेशनात संशोधन होणे गरजेचे आहे ज्योतिषशास्त्र हे जातकाला सावध करते म्हणून आपण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे जयश्री बेलसरे यांनी सांगितले की आज जगात दोन गुणिले दोन बरोबर चार येते किंवा दोन अधिक दोन बरोबर चार मग ज्योतिषांच्या फलादेश फरक का पडतो सर्वांचा फलादेश एकच आला पाहिजे यासाठी अधिवेशनाची गरज आहे अध्यक्षीय भाषणात जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी सांगितले की ज्योतिषी प्रकाश देणारे शास्त्र आहे प्रकाशाचा मार्ग ईश्वरा कडे जातो सर्व ज्योतिषी एकत्र आल्यावर आता ठाम निर्णय होणे गरजेचे आहे आणि ही काळाची गरज आहे असे सांगितले यावेळी किसन पुजारी जाखणगाव आत्माराम भोज मसूर पद्माकर शास्त्री मसवड बाळासाहेब खटावकर वडूज मिलिंद मोकाशी मोर मसूर प्राचार्य रमणलाल शहा सातारा यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास माजी सभापती सोमनाथ भोसले तुषार जोशी सरपंच जयदीप कट्टे सुहास समुद्र सचिन बेहरे दत्तात्रेय चिवटे मंगेश महाडिक पद्मा कासट श्रीधर कुलकर्णी गोविंद कोष्टी डॉक्टर विकास खिलारे ज्योतिष तज्ञ अभ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले तर आभार नंदकुमार जोशी यांनी मानले