क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-भारती विदयापीठ – एकमेकाकडे बघण्याच्या रागातुन तरुणाचा खुन करणा-या ४ विधीसंघर्षीत बालकांचा पाठलाग करुन सातारा रोड, वेळु येथुन घेतले ताब्यात.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दिनांक – ०५/०५/२०२६

पुणे:-भारती विदयापीठ – एकमेकाकडे बघण्याच्या रागातुन तरुणाचा खुन करणा-या ४ विधीसंघर्षीत बालकांचा पाठलाग करुन सातारा रोड, वेळु येथुन घेतले ताब्यात.

दिनांक ०४/०५/२०२६ रोजी २१/१५ वा चे सुमारास निलगिरी चौक, आंबेगाव पठार, पुण े येथ े विधीसंघर्षित बालक यान े फिर्यादी यांचा मुलगा नयन सचिन जाधव, वय १८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ०४ चौथा मजला, शिवकृपा अपार्टमेंन्ट, साई-सिध्दी चौक, आंबेगाव पठार पुण े याच े सोबत दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन, त्याचे साथीदारांच े मदतीन े नयन याच े डोक्यावर लोखंडी धारधार हत्यारान े वार करुन, तसेच सिमेन्टचे ब्लॉक त्याच्या डोक्यामध्य े मारुन, त्यास जिवे ठार मारले आह े म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं १८०/२०२६ भा.न्या.सं.क. १०३ (१), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाण े दाखल गुन्हयातील मुख्य विधीसंघर्षित बालकाचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले यांना त्यांच े गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, विधिसंघर्षित बालक त्याचे साथीदारांसह सातारा रोडवरील वेळु गावाजवळ थांबले आहेत बातमीच्या अनुषंगाने नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेळु गावाजवळ जाऊन त्यांचा शोध घेतला असता गुन्हयातील मुख्य विधीसंघर्षीत बालक हा इतर दोन विधीसंघर्षीत बालकांसह मिळून आला. त्यांचेकडे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांनी सदर गुन्हा त्यांच े दोन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने, त्यांचेकडुन प्राप्त माहीतीवरुन पोलीस अंमलदार महेश बारवकर, तुकाराम सुतार, किरण साबळे, मंगेश गायकवाड यांनी गुन्हयात सहभागी असलेला विधीसंघर्षीत त्यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री.राजेश बनसोडे मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्री. मिलिंद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, श्री. राहुल आवारे, यांच े मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांच े सुचनाप्रमाण े सहा पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, मिथुन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका निकम, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, संदीप आगळ े तसेच अवधुत जमदाड े यांनी केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button