कोरेगाव:-श्री गाडगे महाराज मिशनच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल मधुसूदन मोहिते-पाटील (दादा) यांचे ब्रह्मपुरी येथे जल्लोषात स्वागत.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज मिशनच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल मधुसूदन मोहिते-पाटील (दादा) यांचे ब्रह्मपुरी येथे जल्लोषात स्वागत.
श्री गाडगे महाराज मिशनच्या ब्रह्मपुरी जि. सातारा येथील आश्रमशाळेचे कुटुंबप्रमुख आदरणीय मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांची संस्थेच्या चेअरमनपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर त्यांचे ब्रह्मपुरी येथे आगमन होताच आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
प्रारंभी आश्रमशाळेतील महिला भगिनी व विद्यार्थिनी यांनी औक्षण केले. यावेळी दादांचे ढोल – ताशा – झांज व लेझीमच्या तालावर व टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
ब्रह्मपुरी येथील आश्रमशाळा परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व कंदीपेढा भरवून सत्कार करण्यात आला.
आश्रमशाळेतील विद्यार्थिनी कुमारी प्रणिता शिंदे व सायली दंडीले यांनी गायलेल्या *ये तो सच है की भगवान है* या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
दादांनी आपल्या मनोगतात मिशन परिवारातील प्रत्येक घटकाने संत गाडगेबाबांचे जीवनकार्य, विचार समजून घेऊन त्या मार्गाने वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, श्री.संतोष जाधव सर, श्री.रमेश घोलप सर, पालक प्रतिनिधी श्री.विठ्ठल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने सर्व उपस्थितांना पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.