आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणीत यशवंत बाबांचा रथोत्सव उत्साहात संपन्न.

उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

मायणीत यशवंत बाबांचा रथोत्सव उत्साहात संपन्न.

मायणी प्रतिनिधी____पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ‘श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज की जय ‘या जयघोषात मायणी येथील सद्गुरु यशवंत बाबा महाराजांचा रथोत्सव हजारो भाविकांचे उपस्थितीत साजरा झाला. सकाळी बाबांच्या समाधी मंदिरात प्रतिमेची व पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रथोत्सवास प्रारंभ झाला. नंतर बाबांच्या जयघोषात भक्ती भावाच्या वातावरणात ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाली. मायणीचे सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या यात्रा काळात काळातील आजचा मुख्य दिवस होता. ग्राम प्रदक्षिणेसाठी सकाळी रथात बाबांच्या प्रतिमा व पादुका विधीवत ठेवण्यात आल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले देवस्थान ट्रस्टचे खजिनदार व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, चेअरमन काकासाहेब माने, सचिव द ग माने ,विश्वस्त उमेश माळी ,आबासाहेब माने, रणजीत माने, सरपंच सोनाली माने ,उपसरपंच दादासाहेब कचरे, जि प सदस्या शोभनाताई गुदगे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सूतगिरणीचे चेअरमन रणजीत देशमुख ,स्वप्नील घाडगे ,अनिल माळी ,बंडा गोडसे ,उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर रथाची ग्राम प्रदक्षणा सुरू झाली रथ नाथ गल्ली चावडी चौक, नवी पेठ, परत याच मार्गाने मराठी शाळा परिसर, फुलेनगर, विटा रोड या मार्गाने चौकात आला चौकात भाविकांनी एकच गर्दी केली होती वडूज रोड यात्रा स्थळावरून रथ मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारा दाखल झाला या रथ मार्गात भाविकांनी बाबांच्या चरणावर माता टेकवत नोटांच्या माळा रथावर बांधल्या रथासमोर दिंडी सोहळ्यातील वारकरी, सुहासिनी महिला, सहभागी झाल्या होत्या रथमार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती यात्रेच्या मुख्य दिवशी वडूज रोड लावलेल्या मेवा मिठाईच्या दुकानात यात्रेकरूंनी गर्दी केली होती यावर्षी प्रथमच यात्रेत गगनचुंबी पाळण्याने गर्दी केली होती रथ मार्गात यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोक ठेवला होता.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button