ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अहमदनगर:-निलेश लंके विरुद्ध डॉक्टर सुजय विखे सरळ लढत.

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS

निलेश लंके विरुद्ध डॉक्टर सुजय विखे सरळ लढत.

आमदार लंके यांनी दिला आमदारकीचा राजीनामा.

आमदार लंके झाले भावनिक

अन्याय किती सहन करायचा

आमदार लंके यांनी केला 2 लाखांच्या विजयाचा विश्वास

राज्यातील तुल्यबळ लढत

वाचा सविस्तर

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात आयोजित कार्यक्रमात निलेश लंके यांनी शरद पवार यांची तुतारी चिन्ह हातात देखील घेतले होते. मात्र, तशी कोणतीही – अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आज निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध निलेश लंके अशी ही तुल्यबळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार लंके भावनिक झाले. तुम्ही मला 5 वर्षासाठी आमदार केले पण मला आता राजीनामा द्यावा लागत आहे. मला त्रास देण्याचा अतोनात प्रयत्न झाला. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आता सण किती दिवस करायचे असे म्हणताना आमदार लंके भावनिक झाले. कार्यकर्त्यांनी आता रडायचं नाही लढायचं म्हणत मोठी घोषणाबाजी केली. तुमच्याकडे पैसा आहे तर माझ्याकडे जीवाभावाची माणसे आहेत. 2 लाखांच्या मताधिक्याने विजयी होऊ असा आत्मविश्वास आमदार लंके यांनी व्यक्त केला.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button