वडूज:-वडूज बांधकाम विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांची केली लाचवड.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
वडूज बांधकाम विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांची केली लाचवड.
वडूज दि: सातारा जिल्हा परिषदेच्या खटाव तालुक्यातील वडूज बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता जितेंद्र खलीपे यांची आज लाच घेतल्याप्रकरणी साताऱ्यातील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे घेताना रंगेहातथ पकडले आणि धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची लाचवड साजरी केली .लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये संबंधीत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यावाबत माहिती अशी की,तक्रारदार यांचा अर्थमुव्हर्स व डेव्हपर्स चा व्यवसाय असून त्यांच्या नावाने खटाव पंचायत समितीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे अंतर्गत केलेल्या तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्माती शेडचे असे एकूण चार कामाचे काम पुर्ण केल्याचा दाखला देणे करीता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी दोन बिलाचे दोन टक्क्यानुसार 34 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडी अंती रूपये ५० हजार लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. उपअभियंता जितेंद्र खलीपे यांना ताब्यात घेण्यात आले असून वडूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. खटाव तालुक्यात चांगलीच रंगू लागली आहे.
रंगाचा बेरंग झाला असला तरी यातून अनेक रंग सुटले आहेत .त्यावरही लक्ष ठेवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. विशेष बाब म्हणजे पेडगाव ता खटाव येथील रोजगार हमी योजनेच्या कामातून तपासणी होऊन ही बिल काढण्यास विलंब लागला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कर्ज थकल्यामुळे बँकेने लिलाव काढला जर वेळेत बिल काढले तर आर्थिक टंचाई जाणवणार नाही. असा विचार करूनच ठेकेदाराने काम केले होते. पण या रोजगार हमी योजनेच्या सुरुवातीच्या दोन टक्के रकमातूनच त्यांनी लाचलुचपत पतिबंधक विभागाचा विभागाचा आधार घेतला. आता ही रक्कम दहा टक्के एवढी वाढण्याऐवजी त्या रकमेच्या शिडीच्या काही पायऱ्या आता कमी होणार असून काम तपासून घेतले तरी बिल देण्यास विलंब लागला याचा आता शोध घेणे गरजेचे झालेले आहे.
वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होत असतानाच खटाव तालुक्यातील वडूज बांधकाम विभागात लाच घेणे म्हणजे आचारसंहितेचाच एक भाग आहे की काय ? असं समजून वरिष्ठ अधिकारी लाच घेत असतील तर निवडणुकीच्या अनुषंगाने आणखीन काय काय घडत असेल. याची आता खमंगदार चर्चा सुरू झालेली आहे.
वास्तविक पाहता बांधकाम विभाग आणि मार्च एंडिंग आणि टक्केवारी अशी महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी म्हणा सर्वत्र सुरू आहे. आता अनेक अधिकारी सावध झाले असले तरी ज्या ठेकेदारांचे उकळ पांढरे केलेले आहेत अशा ठेकेदारांना आता आपलं दुःख मांडता येत नाही तर ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशा पद्धतीने आता तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची पाठराखे सुद्धा उभे राहिलेले लागलेले आहे.
पो.नि. सचिन अंकूश राऊत, ला.प्र.वि. सातारा.. पो.नि.विक्रम शिवाजी पवार, ला.प्र.वि. सातारा.. पो.हवा. गणेश ताटे, ला.प्र.वि. सातारा.. पो.ना. निलेश चव्हाण, ला.प्र.वि. सातारा. स.पो.उप. निरीक्षक शंकर सावंत, ला.प्र.वि. सातारा.
. पो.हवा. नितीन गोगावले, ला.प्र.वि. सातारा.७. म.पो.ना. प्रियांका जाधव, ला.प्र.वि. सातारा. पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, ला.प्र.वि. सातारा. .पो.ना मारूती अडागळे ला.प्र.वि. सातारा मार्गदर्शक अधिकारी : राजेश वसंत वाघमारे, पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा. यांच्या टीमने ही कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.