ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वडूज:-युवा नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या खटाव धावत्या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

युवा नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या खटाव धावत्या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद.

वडूज दि: महाराष्ट्राच्या राजकारणामधील नामांकित घराणे म्हणून अकलूजचे मोहिते- पाटील यांचा आजही राजकीय पटलावर दबदबा आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांनी खटाव तालुक्याचा धावता दौरा केला. या दौऱ्याने स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
महायुतीच्या वतीने भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांची उमेदवारी दुसऱ्या यादीतच जाहीर केल्यामुळे माण -खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांची मतदारसंघातील ताकद वाढली आहे व त्यांचा बोलबाला होऊ लागलेला आहे. अशातच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे व नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच खटाव तालुक्याचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी वडूज शेती उत्पन्न बाजार समिती आजी-माजी पदाधिकारी, वडूज नगरीचे माजी सरपंच ते माजी नगराध्यक्ष अशा अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या भेटीमध्ये त्यांनी ही धावती भेट असून अजून उमेदवारी दाखल करण्याला अवधी आहे. परंतु माण खटाव मतदार संघामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे ? याची त्यांनी चाचपणी केली खरी पण, त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक असे काही निष्पन्न झाले नाही.
कोणतेही युद्ध हे सैनिकांच्या पाठ्यबळावर लढावे लागते. त्या अर्थाने त्यांना माण – विधानसभा मतदारसंघात महायुतीला म्हणजेच भाजपला रोखू शकणार अशा प्रामाणिक सैनिकांच्या शोधात ते आले होते . राजकारणामध्ये आक्रमकरित्या विरोधकांना थोपवणे. सध्या तरी गरजेचे आहे. त्या अर्थाने त्यांचा हा दौरा होता. अशी माहिती काही अधिकृत सूत्रांनी दिली.
या दौऱ्यामध्ये जमेची बाजू म्हणजे उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. कोणती राजकीय चर्चा न करता त्यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक ही केले.
अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. तरीही सध्या फलटण नंतर माण -खटाव हा माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. फलटणमध्ये महायुतीकडे माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजप उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आहे परंतु, त्यांच्यामध्ये अंतर्गत वादी विवाद उघडपणे होत आहे.
माण -खटाव मध्ये आमदार जयकुमार गोरे हे भाजपचे आहेत. तर महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाकडे नामांकित कार्यकर्ते गेलेले आहेत. तुर्त वेट अँड वॉच ची भूमिका घेऊनच नेते धैर्यशील पाटील यांना पुढील राजकीय रणनीती ठरवावी लागणार आहे त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतील हे आता सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ ठरवतील. अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

———————————————–
फोटो -खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या वडूज नगरीला भेट देताना नेते धैर्यशील पाटील व मान्यवर (छाया -अजित जगताप- वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button